Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»रायगड नाभिक तरुण संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; पदनियुक्ती सोहळा उत्साहात
राजकारण

रायगड नाभिक तरुण संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; पदनियुक्ती सोहळा उत्साहात

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रायगड नाभिक तरुण संघाची नवी कार्यकारिणी जाहीर; पदनियुक्ती सोहळा उत्साहात

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रायगड जिल्हा नाभिक तरुण संघाच्या नव्याने निवडलेल्या कार्यकारिणीचा पदनियुक्ती सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम जिल्हाध्यक्ष सुदाम बाबू शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली तसेच विश्वस्तांच्या शुभहस्ते संपन्न झाला.
या सोहळ्यात दिनेश मोरे यांची कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली. उपाध्यक्षपदी आदेश बुरुणकर (दक्षिण विभाग), भगवान निमुतकर (मध्य विभाग) आणि विनोद पवार (उत्तर विभाग) यांची निवड झाली.
मुख्य सचिवपदी सुरेंद्र पालांडे यांची निवड करण्यात आली असून सहसचिवपदी सचिन दिवेकर (दक्षिण), विजय भोसले (मध्य) आणि जयेश मोरे (उत्तर) यांची नियुक्ती करण्यात आली. कोषाध्यक्षपदी योगेश शिर्के, हिशोब तपासनीसपदी नितीन बडे तर सह हिशोब तपासनीसपदी जयंत शिंदे यांची निवड झाली.
महाराष्ट्र राज्य प्रतिनिधी म्हणून संतोष गायकवाड, लवाद समिती अध्यक्षपदी राज पवार आणि उपाध्यक्षपदी किरण शिंदे यांची निवड करण्यात आली. तसेच पंचकोशी अध्यक्षपदी बबन सकपाळ (दक्षिण), प्रमोद जाधव (मध्य) आणि सुनील खराडे (उत्तर) यांची नियुक्ती करण्यात आली.
संघटकपदी संदीप चाफेकर (दक्षिण), प्रविण खराडे (मध्य) आणि अमित पंडीत (उत्तर) यांची निवड झाली. याशिवाय १३ सल्लागार, ४५ जिल्हा सदस्य, १५ तालुका अध्यक्ष आणि एक महिला प्रतिनिधी अशा विविध पदांवरही नियुक्त्या करण्यात आल्या.
कार्यक्रमात “पदाचा हक्क, अधिकार आणि काम” या विषयावर जिल्हाध्यक्ष सुदाम शिंदे यांनी मार्गदर्शन केले. तसेच बापुसाहेब सोनगिरे, मयूर दिवेकर आणि यशवंत खराडे या विश्वस्तांसह अनेक पदाधिकाऱ्यांनीही उपस्थितांना मार्गदर्शन केले.
सभेचे सूत्रसंचालन जिल्हा सचिव सुरेंद्र पालांडे यांनी केले. उपस्थित समाजबांधवांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कार्यक्रम यशस्वी केला. शेवटी कार्याध्यक्ष दिनेश मोरे यांनी सर्वांचे आभार मानत संघाची पुढील वाटचाल सामाजिक प्रगती व उत्कर्षाच्या दिशेने राहील, असा विश्वास व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us