राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी ॲड. मनोजकुमार शिंदे यांची नियुक्ती
रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा रायगड लोकसभा मतदारसंघाचे खासदार सुनील तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली ॲड. मनोजकुमार नारायण शिंदे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अलिबाग विधानसभा कार्याध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. याबाबतचे नियुक्तीपत्र राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे रायगड जिल्हाध्यक्ष तथा रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व सभापती सुधाकर परशुराम घारे यांच्या स्वाक्षरीने देण्यात आले.
रोहा येथील ज्येष्ठ नागरिक सभागृहात आयोजित कार्यक्रमात खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते ॲड. मनोजकुमार शिंदे यांना नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले. यावेळी रायगड जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती मधुकर पाटील, रोह्याच्या नगराध्यक्षा वनश्री शेडगे,विजयराव मोरे, समीर सपकाळ, महेंद्र गुजर, श्री . रविंद्र चाळके तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या नियुक्तीमुळे अलिबाग विधानसभा मतदारसंघात पक्ष संघटना अधिक मजबूत करण्यास, पक्षविस्ताराला गती देण्यास आणि सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पक्षाची धोरणे प्रभावीपणे पोहोचविण्यास बळ मिळेल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला. तसेच ॲड. मनोजकुमार शिंदे यांनी पक्षश्रेष्ठींनी दाखविलेल्या विश्वासाबद्दल आभार मानत पक्ष संघटना अधिक सक्षम करण्यासाठी आणि जनतेच्या प्रश्नांवर सातत्याने काम करण्याची ग्वाही दिली.