Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल ( अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वळवली गावात रसायनशास्त्र जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न
शैक्षणिक

चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल ( अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वळवली गावात रसायनशास्त्र जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 20, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल ( अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने वळवली गावात रसायनशास्त्र जनजागृती कार्यक्रम उत्साहात संपन्न

नवीन पनवेल  जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या चांगू काना ठाकूर आर्ट्स, कॉमर्स अँड सायन्स कॉलेज, न्यू पनवेल ( अधिकारप्रदत्त स्वायत्त) येथील रसायनशास्त्र विभागाच्या वतीने “रसायनशास्त्र विषयाचे महत्त्व आणि दैनंदिन जीवनातील उपयोग” या विषयावर जनजागृती कार्यक्रम उत्साहात पार पडला. हा कार्यक्रम मंगळवार, दिनांक १७ मार्च २०२६ रोजी सकाळी ९ वाजता रायगड जिल्हा परिषद शाळा, वळवली (पनवेल महानगरपालिका क्षेत्र) येथे आयोजित करण्यात आला होता.

लोकनेते माजी खासदार रामशेठ ठाकूर तसेच आमदार प्रशांत ठाकूर यांच्या शिक्षणविस्ताराच्या विचारातून प्रेरित होऊन हा उपक्रम राबविण्यात आला. कार्यक्रमात विद्यार्थ्यांना रसायनशास्त्राचे दैनंदिन जीवनातील उपयोग, विषयाचे महत्त्व आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन विकसित करण्याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले.
कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा. (डॉ.) एस. के. पाटील यांचे मार्गदर्शन लाभले. रसायनशास्त्र विभाग प्रमुख प्रा. डॉ. बी. व्ही. जाधव यांनी कार्यक्रमाचे नियोजन व समन्वय साधला. सीकेटी महाविद्यालयाचे प्राध्यापक तथा वळवली गावाचे सुपुत्र डॉ. शैलेश वाजेकर यांच्या पुढाकाराने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

या वेळी अ‍ॅक्टिव्हिटी कोऑर्डिनेटर डॉ. व्ही. एस. कांबळे, श्री. राहुल पाटील तसेच नॉन-टीचिंग स्टाफमधील श्री. चंद्रकांत परकाळे उपस्थित होते. शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. ज्योती घोसाळकर यांनी मोलाचे सहकार्य केले. शाळेच्या वतीने सौ. रेश्मा पाटील यांनी स्वागत केले, तर श्री. दयानंद मोकल यांनी आभार प्रदर्शन केले.

कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये विज्ञानाविषयी उत्सुकता वाढून रसायनशास्त्र विषया बद्दलची भीती दूर होण्यास मदत झाली. तसेच महाविद्यालय व शाळा यांच्यातील शैक्षणिक सहकार्य अधिक दृढ झाले असून भविष्यातही अशा उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

२० वर्षांच्या ज्ञानसेवेचा गौरव; रोठ खुर्दच्या शिक्षिका अमिता बामणे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

September 5, 2026

युवाशक्तीला रोजगाराची दिशा; प्रमोद म्हसकर प्रतिष्ठानच्या भव्य रोजगार मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद! ६५ नामांकित कंपन्यांचा सहभाग; २,२३७ उमेदवारांची नोंदणी, ४३७ युवकांची जागेवरच निवड

August 31, 2026

३० ऑगस्टला रोह्यात भव्य रोजगार मेळावा; २ हजारांहून अधिक तरुणांची नोंदणी, ५० हून अधिक कंपन्यांमध्ये म्हसकर यांच्या माध्यमातून ‘ऑन द स्पॉट’ नोकरीची संधी!

August 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us