Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • *आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.
  • *रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*
  • ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी
  • खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.
  • तळा रोहा मुख्य रस्त्यावरमाती वाहून आल्याने अपघाताला आमंत्रण.मोठ्या अपघाताची शक्यता.
  • अखेर भल्या मोठ्या खड्ड्याने भातसई गावचे पोलीस पाटील संकेत कोतवालचा घेतला बळी, तालुक्यातून संताप संतप्त ग्रामस्थांकडून शुक्रवारी रेल्वे लगत मार्गावर ठिय्या आंदोलन, जोरदार घोषणाबाजी,असे खड्डे अजून किती बळी घेणार, नागरिकांचा लोकप्रतिनिधींना संतप्त सवाल.
  • हरलेल्या उमेदवाराचा “सदस्य” म्हणून बॅनरवर उल्लेख; संविधानिक पदाचा अवमान होत असल्याचा आरोप
  • खासदार सुनीलजी तटकरे साहेब यांच्या वाढदिवसा निमित्त लाख लाख शुभेच्छा शुभेच्छुक श्री मधुकरशेठ पाटील उपाध्यक्ष रायगड जिल्हा परिषद
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलतर्फे नगर परिषद शाळा क्र. १० मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
शैक्षणिक

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलतर्फे नगर परिषद शाळा क्र. १० मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 2, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलतर्फे नगर परिषद शाळा क्र. १० मधील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणाची आवड वाढावी आणि गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत मिळावी या उद्देशाने रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलच्या वतीने रोहा नगर परिषद कै. प्रफुल्ल शेठ बारटके मंगलवाडी शाळा क्र. १० येथे विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे अध्यक्ष श्री. विजय दिवकर यांच्या पुढाकारातून हा उपक्रम उत्साहात पार पडला.
शैक्षणिक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रल ही संस्था शिक्षण, आरोग्य, रक्तदान, दंतचिकित्सा शिबिरे तसेच विविध सामाजिक उपक्रमांद्वारे सातत्याने समाजसेवा करत असून, शहराबरोबरच दुर्गम आदिवासी भागातील नागरिकांनाही मदतीचा हात देत असते.
यापूर्वीही सन २०२६ मध्ये या संस्थेने नगरपालिका शाळा क्र. १, ९ व १० (मंगलवाडी संकुल) येथे सुंदर हस्ताक्षर स्पर्धा आणि बालकांच्या काव्यवाचन स्पर्धांचे आयोजन करून विजेत्या विद्यार्थ्यांना बक्षिसांचे वितरण केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये शैक्षणिक आणि सर्जनशील उपक्रमांविषयी विशेष उत्साह निर्माण झाला आहे.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी रोहा नगर परिषदेचे शिक्षण सभापती मा. श्री. रविंद्र चाळके, गटनेते श्री. महेंद्र गुजर, पाणीपुरवठा सभापती श्री. मयुर दिवेकर, रोटरी क्लब ऑफ रोहा सेंट्रलचे अध्यक्ष श्री. विजय दिवकर, सचिव श्री. राकेश कागडा, श्री. धर्मिन कंसारा, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. अमित सावंत, उपाध्यक्ष श्री. संदीप शेवाळे, श्री. मोरे सर आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मनोगत व्यक्त करताना श्री. मयुर दिवेकर यांनी श्री. विजय दिवकर व सौ. संध्या दिवकर या दाम्पत्याच्या सामाजिक कार्याचे विशेष कौतुक केले. शाळा क्र. १० चे मुख्याध्यापक श्री. ईश्वर लाडे, सर्व शिक्षकवृंद तसेच विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शिक्षिका सौ. संध्या विजय दिवकर यांनी केले, तर सूत्रसंचालन श्री. पानवकर यांनी केले. सामाजिक बांधिलकी जपत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी राबविण्यात आलेल्या या उपक्रमाचे सर्व स्तरांतून कौतुक करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.

July 13, 2026

फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.

June 28, 2026

भविष्यातील स्पर्धा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज” – आमदार अनिकेत तटकरे

June 27, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

*आपल्याआरोग्य सुदृढ राहण्यासाठी दाताचे आरोग्य राखणे महत्वाचे…डॉ. संतोष झापकर (दंत शल्य चिकित्सक जिल्हा रायगड) *रायगड जिल्हा परिषद शाळा तळेगाव / तळे येथे दंत आरोग्य समुपदेशन संपन्न.

July 13, 2026

*रोह्यातील अस्वच्छ हॉटेलांवर कारवाई कधी? अन्न सुरक्षा अधिकारी नितीन मोहिते यांच्या भूमिकेकडे नागरिकांचे लक्ष*

July 13, 2026

ग्रामपंचायत प्रशासन व नागरिकांनी संवर्धना बरोबर संगोपन करावे…पुष्पा नेरकर विस्तार अधिकारी

July 11, 2026

खा. सुनील तटकरे यांच्या वाढदिवसानिमित्त देवकान्हे ग्रामपंचायत हद्दीतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य व खाऊ वाटप.

July 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us