Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»रायगड जिल्हा परिषद शाळा, गायमुख येथे प्रवेशोत्सव नव्या स्वप्नांचा.. शिक्षणोत्सव उज्ज्वल भवितव्याचा!”* या प्रेरणादायी संदेशाने स्वागत
शैक्षणिक

रायगड जिल्हा परिषद शाळा, गायमुख येथे प्रवेशोत्सव नव्या स्वप्नांचा.. शिक्षणोत्सव उज्ज्वल भवितव्याचा!”* या प्रेरणादायी संदेशाने स्वागत

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*रायगड जिल्हा परिषद शाळा, गायमुख येथे
प्रवेशोत्सव नव्या स्वप्नांचा.. शिक्षणोत्सव उज्ज्वल भवितव्याचा!”* या प्रेरणादायी संदेशाने स्वागत.

*तळा:किशोर पितळे :

उन्हाळ्याची प्रदीर्घ सुट्टीसंपवून, मनात नवीन आशा-आकांक्षा आणि हातात नवीन वह्या-पुस्तके घेऊन जिल्ह्यातील विद्यार्थ्यांनी सोमवारी १५जून रोजी उत्साहात शाळेत आपले पहिले पाऊल टाकले. यानिमित्ताने रायगड जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये अनोखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यात आले. ढोल-ताशांचा गजर, फुलांची उधळण आणि आकर्षक औंक्षण करत नवोदित विद्यार्थ्यांचा हा प्रवेशोत्सव अत्यंत दिमाखात साजरा झाला.रायगड जिल्हा परिषद शाळा गायमुख येथे शैक्षणीक वर्ष *२०२६-२७* च्या प्रवेशोत्सव नव्या स्वप्नांचा… शिक्षणोत्सव उज्ज्वल भवितव्याचा!”* या प्रेरणादायी संदेशाने प्रारंभानिमित्त *शाळा प्रवेशोत्सव व शाळा पूर्वतयारी मेळावा*अत्यंत उत्साहपूर्ण आणि आनंदमय वातावरणात संपन्न झाला. या कार्यक्रमाला पालक, ग्रामस्थ, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य, माजी विद्यार्थी,शिक्षक व विद्यार्थ्यांचीउत्स्फूर्तउपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात नवागत विद्यार्थ्यांच्या जंगी स्वागताने करण्यात आली.विद्यार्थ्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले तसेच त्यांच्या पावलांचे ठसे उमटवून शिक्षणाच्या नव्या प्रवासाचा शुभारंभ करण्यात आला. लेझीमच्या तालावर काढण्यात आलेल्या प्रभात फेरीमुळे संपूर्ण गावात शैक्षणिक जनजागृतीचे वातावरण निर्माण झाले. यावेळी विद्यार्थ्यांना *मोफत पाठ्यपुस्तके, गणवेश, शालेय उपयोगी साहित्य तसेच पेनचे वाटप* करण्यात आले. नवीन शैक्षणिक वर्षासाठी आवश्यक साहित्य मिळाल्याने विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद आणि उत्साह दिसून येत होता.
शाळा व्यवस्थापन समितीच्या बैठकीत विविध महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा करण्यात आली. यामध्ये मागील बैठकीचे इतिवृत्त वाचन, नवागत विद्यार्थ्यांचे स्वागत,पाठ्यपुस्तक वाटप,पोषण आहार, विद्यार्थ्यांची सुरक्षितता, शाळेच्या विकासासाठी आवश्यक सुविधा, आर्थिक मदत, शैक्षणिक गुणवत्तावाढ, विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपक्रम तसेच माजी विद्यार्थ्यांच्या सहकार्याबाबत सविस्तर विचारविनिमय करण्यात आला.यावेळी विद्यार्थ्यांच्या यशाचा विशेष गौरव करण्यात आला. शाळेची गुणवंत विद्यार्थिनी *कु. मानसी प्रकाश दुरे* हिची *नवोदय विद्यालयात निवड* झाल्याबद्दल तिचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. तसेच शाळेचा माजी विद्यार्थी *कुमार सम्यक भिमराज जाधव* याची *भारतीय सैन्यात निवड* झाल्याबद्दल त्याचाही विशेष सन्मान करण्यात आला. उपस्थितांनी दोन्ही विद्यार्थ्यांच्या यशाचे कौतुक करून त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचेअध्यक्ष नामदेव बटावले, सदस्य रुचिता चाचले, रमेश मोडके, ज्ञानदेव अंबावले,लक्ष्मण चोरगे, प्रकाश दुरे* तसेच सर्व शाळा व्यवस्थापन समिती सदस्य व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.गावचे अध्यक्ष पांडुरंग ताम्हणकर,उपाध्यक्ष पोटले, सचिव देवजी काप तसेच ग्रामस्थांचे मोलाचे सहकार्य लाभले. कार्यक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन मुख्याध्यापक अमिष भौड, चेतन जगताप ,राहुल उगलमुगले तसेच शाळेतील सर्व विद्यार्थी यांच्या सक्रिय सहभागातून करण्यात आले. कार्यक्रमामुळे नव्या शैक्षणिक वर्षाची सुरुवात उत्साहपूर्ण वातावरणात झालीअसून विद्यार्थ्यांमध्ये शिक्षणा विषयी सकारात्मक ऊर्जा निर्माण झाली आहे.
जिल्हा परिषद शाळांमधील या गुणात्मक बदलांमुळे आता अनेक पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास पुन्हा दृढ होत असून, अनेक भागांत चक्क खाजगी शाळांमधून नाव कमी करून पालक आपल्या मुलांना जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये प्रवेश मिळवूनघेतआहेत,हीअत्यंतअभिमानास्पद बाब असल्याचे त्यांनी नमूद केले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप. *रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.

August 7, 2026

लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला – आमदार रविशेठ पाटील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन

August 6, 2026

कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us