Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»पर्यावरण स्नेही आठवडा बाजारातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची शिकवण
शैक्षणिक

पर्यावरण स्नेही आठवडा बाजारातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची शिकवण

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 18, 2026Updated:March 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पर्यावरण स्नेही आठवडा बाजारातून विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञानाची शिकवण

(प्रतिनिधी) – सत्यप्रसाद आडाव चणेरा

रायगड जिल्हा परीषद केंद्र शाळा न्हावे (मराठी) येथे बुधवार दिनांक १८ मार्च रोजी “पर्यावरण स्नेही आठवडा बाजार” मोठ्या उत्साहात भरवण्यात आला. या उपक्रमात विद्यार्थ्यांनी विविध खाद्यपदार्थांचे स्टॉल लावून प्रत्यक्ष विक्रीचा अनुभव घेतला.
या बाजारात चिकन पास्ता, सुकी भेळ, चायनीज भेळ, समोसा, पावभाजी, पाणीपुरी, कलिंगड, कैरी करमट, लिंबू सरबत, कोकम सरबत, कचोरी, करवंद लोणचे अशा अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांची आकर्षक मांडणी करण्यात आली होती. विद्यार्थ्यांनी स्वतः सादर केलेल्या पदार्थांची विक्री करताना ग्राहकांशी संवाद साधला, पैशांची देवाण-घेवाण केली आणि व्यवहार कौशल्य आत्मसात केले.
या उपक्रमामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे विद्यार्थ्यांना व्यवहारज्ञान, आर्थिक साक्षरता तसेच देवाण-घेवाणीचे महत्त्व समजावून देणे होय. तसेच पर्यावरणपूरक पद्धतीने बाजार भरवून स्वच्छता आणि शाश्वततेचा संदेश देण्यात आला.
कार्यक्रमासाठी शाळेचे मुख्याध्यापक गणेश बिरवाडकर, उपशिक्षक, शाळा व्यवस्थापन कमिटी अध्यक्ष, उपाध्यक्ष तसेच पालकांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी हा उपक्रम यशस्वीपणे पार पाडला. विद्यार्थ्यांच्या उत्स्फूर्त सहभागामुळे आणि शिक्षकांच्या योग्य मार्गदर्शनामुळे हा “पर्यावरण स्नेही आठवडा बाजार” उपक्रम सर्वांच्या पसंतीस उतरला आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी उपयुक्त ठरला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*दैवज्ञ ब्राह्मण समाज तळे वतीने कै. नाना शंकरशेठ १६१वी पुण्यतिथी व विद्यार्थ्यांना ग्रामर पुस्तके व पेन वाटप. *रायगड जिल्हा परिषद तळे मराठी शाळा येथे स्तुत्य उपक्रम.

August 7, 2026

लोकनेते रामशेठ ठाकूर हे समाजसेवेतील ‘हिरा’; त्यांच्या नेतृत्वाने जनार्दन भगत शिक्षण संस्थेने महाराष्ट्राचा नावलौकिक वाढवला – आमदार रविशेठ पाटील जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या मुख्य प्रशासकीय कार्यालयासह भागूबाई चांगू ठाकूर कॉलेज ऑफ लॉच्या भव्य मूट कोर्टचे उद्घाटन

August 6, 2026

कै. नारायण पांडुरंग गोरे गुरुजी यांच्या स्मृतिदिनानिमित्त माजी विद्यार्थ्यांकडुन शैक्षणिक साहित्य व छत्री वाटप

July 24, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us