Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»पनवेलमध्ये विजयाचा जल्लोष
राजकारण

पनवेलमध्ये विजयाचा जल्लोष

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 4, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
पनवेलमध्ये विजयाचा जल्लोष
पनवेल (प्रतिनिधी) पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरीच्या विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत एकहाती सत्ता मिळवली. हा आनंद देशभर साजरा करण्यात आला, त्या अनुषंगाने भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या नेतृत्वाखाली पनवेलमध्ये फटाक्यांची आतषबाजी आणि मिठाई वाटून आनंद व्यक्त करण्यात आला.
        पश्चिम बंगाल, आसाम, पुडुचेरी विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने घवघवीत यश संपादन करत स्पष्ट बहुमताने सत्ता स्थापन करण्याच्या पार्श्वभूमीवर देशभर आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. या विजयाचा जल्लोष पनवेल शहरातही उत्साहात साजरा करण्यात आला. भाजपचे प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी यांच्या नेतृत्वाखाली पनवेल येथे फटाक्यांची आतषबाजी करून आणि मिठाई वाटून कार्यकर्त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त केला. यावेळी “भारत माता की जय” आणि “भाजपचा विजय असो” अशा घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या कार्यक्रमाला पनवेल महापालिकेचे सभागृहनेते प्रकाश बिनेदार, जिल्हा सरचिटणीस चारुशीला घरत, उपाध्यक्ष गणेश कडू, महापालिकेचे स्थायी समिती सभापती बबन मुकादम, शहर अध्यक्ष नगरसेवक सुमित झुंझारराव, नगरसेवक अजय बहिरा, शहर सरचिटणीस अमित ओझे, प्रशांत शेट्ये, शिल्पा म्हात्रे यांच्यासह पदाधिकारी, आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा देत हा विजय देशाच्या प्रगतीसाठी महत्त्वाचा टप्पा असल्याची भावना व्यक्त केली.या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी पक्षाच्या नेतृत्वाचे अभिनंदन करत आगामी काळातही अशाच प्रकारे जनतेचा विश्वास संपादन करण्याचा संकल्प व्यक्त केला.
Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us