Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड
  • रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट
  • बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये
  • रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,
  • उलवेत १३ मे रोजी लोकनेते रामशेठ ठाकूर अमृतमहोत्सवी अभिष्टचिंतन सोहळा; शाळा इमारतीचे उद्घाटन
  • तळा तालुक्यात गारासह वादळी पावसाने घेतला युवकाचा बळी
  • सामाजिक कार्यकर्ते श्री. प्रमोद शेठ म्हसकर यांच्याकडून किल्ला येथील नितेश मुंढे यांना मदतीचा आधार
  • तळा येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व शिबिर संपन्न.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»अ‍ॅड. अनिषा शिंदे यांना भारती विद्यापीठाचे सुवर्णपदक; एल.एल.एम. परीक्षेत दैदीप्यमान यश
शैक्षणिक

अ‍ॅड. अनिषा शिंदे यांना भारती विद्यापीठाचे सुवर्णपदक; एल.एल.एम. परीक्षेत दैदीप्यमान यश

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

अ‍ॅड. अनिषा शिंदे यांना भारती विद्यापीठाचे सुवर्णपदक; एल.एल.एम. परीक्षेत दैदीप्यमान यश

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

भारती विद्यापीठ (अभिमत विश्वविद्यालय) येथे नुकत्याच पार पडलेल्या पदवीदान समारंभात अ‍ॅड. अनिषा अनिल शिंदे यांनी एल.एल.एम. (LL.M.) पदवीच्या परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवून सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यांच्या या अभूतपूर्व यशामुळे रोहा तालुक्यात सर्व स्तरांतून अभिनंदनाचा वर्षाव होतो आहे.
अनिषा शिंदे यांनी आपल्या शैक्षणिक कारकिर्दीत सातत्य राखत आणि कठीण परिश्रम, सखोल ज्ञान तसेच चिकाटीच्या जोरावर विद्यापीठाच्या गुणवत्ता यादीत सर्वोच्च स्थान मिळवले. २३ एप्रिल २०२६ रोजी आयोजित झालेल्या भारती विद्यापीठाच्या पदवीदान समारंभात केंद्रीय राज्यमंत्री मा. प्रतापराव जाधव यांच्या हस्ते त्यांना हे सुवर्णपदक प्रदान करण्यात आले.
अनिषा शिंदे यांचा अभ्यासातला दृष्टिकोन केवळ परीक्षेत उत्कृष्ट गुण मिळवण्यापुरता मर्यादित नाही, तर कायद्याचा वापर समाजातील सामान्य घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी कसा केला जाऊ शकतो, यावर त्यांचा विश्वास आहे. यशाबद्दल बोलताना त्यांनी सांगितले, “नियोजित अभ्यास आणि प्राध्यापकांचे मार्गदर्शन यामुळेच मी हे यश मिळवू शकले.”
विधी क्षेत्रातील दिग्गज, मार्गदर्शक, मित्रपरिवार आणि नातेवाईक यांनी अ‍ॅड. अनिषा शिंदे यांचे अभिनंदन केले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रवास महिला वकिलांसाठी प्रेरणादायक ठरला आहे आणि त्यांनी या क्षेत्रात एक नवीन आदर्श निर्माण केला आहे.
भविष्यात विधी क्षेत्रात संशोधन व वकिली व्यवसायाद्वारे न्यायदान प्रक्रियेत मोलाचे योगदान देण्याचा त्यांचा मानस आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026

ज्ञानांकुर इंग्लिश मीडियम स्कूल खांब शाळेचा दहावीचा निकाल १०० टक्के,८८.६०% गुण मिळवून सेजल शेडगे प्रथम.

May 8, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोहा तालुक्यातील आदिवासी विद्यार्थिनीची गगनभरारी कोलाडच्या सपना वाघमारेची उच्च शिक्षणासाठी यूकेमधील नामांकित विद्यापीठांमध्ये निवड

May 14, 2026

रोहा आगारातील कर्मचाऱ्यांसाठी मनोहर शेठ देसाई यांची थंड पाण्याचा कूलर ची भेट

May 12, 2026

बुधवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार, भाजपचे प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण यांच्यासह अनेक मान्यवर उलवे नोडमध्ये

May 12, 2026

रा.ग .पोटफोडे विद्यालयाचा निकाल ८४.०९% टक्के,८८% गुण कु. अधिकारी ईश्वरी सुरेश वर्गात सर्व प्रथम,

May 11, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us