Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»*राष्ट्रवादीला मोठा धक्का, अशोक धोत्रेंच्या नेतृत्वात शिवसेनेची ताकद वाढली;
राजकारण

*राष्ट्रवादीला मोठा धक्का, अशोक धोत्रेंच्या नेतृत्वात शिवसेनेची ताकद वाढली;

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 24, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*राष्ट्रवादीला मोठा धक्का, अशोक धोत्रेंच्या नेतृत्वात शिवसेनेची ताकद वाढली;*
*रोहा खालचा मोहल्ला मध्ये मोठा पक्षप्रवेश*

रोहा/समीर बामुगडे/

रोहा तालुक्यातील खालचा मोहल्ला परिसरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला मोठा धक्का बसल्याची चर्चा जोरात सुरू आहे. अनेक वर्षे राष्ट्रवादीशी जोडलेले स्थानिक कार्यकर्ते आणि पदाधिकारी यांनी एकत्रितपणे शिवसेना (शिंदे गट) मध्ये प्रवेश करत स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ घडवून आणली आहे.

रम्मक शेटे, अनिफ पठाण, मजेदार किडमगैर, फैजल सिद्दीक, असिद पेढेकर, बाबाजान शेटे, असल्लम खान, लाला शेख, सफा शेटे, शगुफ्ता डागे, नोमरान, खतिजा रोगे, राकेश शेडगे यांसारख्या प्रभावी कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटावर विश्वास ठेवत अधिकृत प्रवेश केला. या सामूहिक निर्णयामुळे खालचा मोहल्ला परिसरातील राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलल्याचे चित्र दिसून आले.

या भव्य पक्षप्रवेशाचे नेतृत्व स्थानिक नेते अशोक धोत्रे यांनी केले. त्यांच्या नेतृत्वामुळे शिवसेनेची ताकद मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे.

अशोक धोत्रे यांची ताकद रोह्यातील राजकारणात वेगळीच ओळख निर्माण करणारी आहे. गेल्या नगरपालिका निवडणुकीत त्यांनी शिवसेना (शिंदे गट) मध्ये पक्षप्रवेश केल्यानंतर अवघ्या ७-८ दिवसांत तब्बल ४ ते ५ हजार मतं मिळवत आपली संघटनशक्ती आणि जनाधार ठळकपणे सिद्ध केला. इतक्या कमी कालावधीत मिळालेला हा प्रतिसाद स्थानिक राजकारणात मोठा संदेश देणारा ठरला.

विशेष म्हणजे त्यांच्या वॉर्डात दोन्ही ठिकाणी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसला अक्षरशः धूळ चारत आपली पकड मजबूत केली. केवळ निवडणुकीपुरते मर्यादित न राहता, कार्यकर्त्यांशी असलेला संपर्क, लोकांच्या प्रश्नांवर तात्काळ भूमिका आणि सातत्याने काम करण्याची पद्धत यामुळे अशोक धोत्रे यांच्यावर लोकांचा विश्वास दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे.

आज खालचा मोहल्ला परिसरात झालेला मोठा पक्षप्रवेश हा त्याच विश्वासाचा परिणाम मानला जात आहे. अशोक धोत्रे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना शिंदे गटाची ताकद झपाट्याने वाढत असून, रोह्यातील राजकारणात ते एक निर्णायक चेहरा म्हणून पुढे येत आहेत.

दरम्यान, या घडामोडीमुळे रोह्यातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसत असून आगामी निवडणुकांमध्ये याचे मोठे परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. खालचा मोहल्ला हा राष्ट्रवादीचा बालेकिल्ला मानला जात असताना, तेथून झालेला हा मोठा पक्षप्रवेश शिवसेना शिंदे गटासाठी निर्णायक ठरण्याची शक्यता आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us