Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»*नागोठणे शहरात भाजपाचा 46 वा वर्धापन वर्धापन दिन साजरा*
राजकारण

*नागोठणे शहरात भाजपाचा 46 वा वर्धापन वर्धापन दिन साजरा*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter

*नागोठणे शहरात भाजपाचा 46 वा वर्धापन वर्धापन दिन साजरा*

प्रतिनिधी सुदर्शन कोटकर

आज भारतीय जनता पक्षाच्या 46 व्या वर्धापन दिनाच्या निमित्ताने नागोठणे शहर आणि नागोठणे विभाग यांच्या वतीने रोहा तालुका नागोठणे मंडळ अध्यक्ष श्री महेश दादा ठाकुर यांच्या मार्गदर्शनात नागोठणे शहराध्यक्ष श्री गणेश चंद्रकांत घाग आणि तालुका सरचिटणीस ( महामंत्री ) श्री एकनाथ जी ठाकुर यांच्या नेतृत्वाखाली भारतमातेचे पूजन आणि भाजपचा ध्वज पुजन करून डौलाने फडकवला त्याच बरोबर डॉ श्यामाप्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाळ उपाध्याय व अटल बिहारी वाजपेयी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले.
यावेळी शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी उपस्थित सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचे स्वागत केले.
प्रास्ताविक भाषण ज्येष्ठ कार्यकर्ते श्री विवेक जी रावकर यांनी केले.त्यात त्यांनी सुरुवातीच्या काळापासून भाजपची वाटचाल कशी होती हे सांगितले.
त्यानंतर शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी भाजपची सध्याची वाटचाल आणि लोकाभिमुख उपक्रम आणि सर्वसामान्यांचे हित जपणारा पक्ष म्हणुन आज भाजपा तुमची आमची सर्वांची , देशातील प्रमुख राजकीय पक्ष असल्याचे सांगितले.
आज आपले सर्वांचे लाडके पंतप्रधान आदरणीय श्री नरेंद्र जी मोदी यांच्या कुशल नेतृत्वात जगात आपल्या देशाचे नाव आणि वर्चस्व असल्याचे दिसून येते.
राज्यात आदरणीय मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपा विकासाची कामे करीत असल्याचे शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांनी आवर्जुन सांगितले.
गणेश घाग यांनी पुढे सर्व कार्यकर्ते आणि नागरिकांना आवाहन केले की अफवांना बळी पडू नका, काही समाजकंटक सामाजिक शांतता बिघडवण्याचा प्रयत्न करीत आहेत, लोकांमध्ये जाऊन प्रत्यक्ष वस्तुस्थिती त्यांना समजुन सांगा.
अनेक कल्याणकारी योजना केंद्र सरकारने आणि महाराष्ट्र सरकारने सुरू केल्या आहेत.
त्या आपण लोकांपर्यंत पोहोचवल्या पाहिजेत.
यावेळी दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष श्री सोपान जी जांबेकर यांनी ही फोनवरून शहराध्यक्ष श्री गणेश घाग यांना भाजपा स्थापना दिनाच्या निमित्ताने होत असलेल्या कार्यक्रमाचा आढावा घेतला व शुभेच्छा दिल्या आणि असेच उपक्रम एकोप्याने घेण्याचे सांगितले.
माजी जिल्हा उपाध्यक्ष श्री किशोर भाई म्हात्रे यांनी ही या कार्यक्रमाच्या निमित्ताने नागोठणे शहर अध्यक्ष म्हणून श्री गणेश घाग यांना शुभेच्छा दिल्या आणि असेच कार्यक्रम आयोजित करून पक्ष संघटना शहरात वाढवा असे सुचविले.
यावेळी नागोठणे भाजपा कार्यालयात तालुका सरचिटणीस श्री एकनाथ जी ठाकुर, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष श्री निखिल जी मढवी, विभागीय अध्यक्ष श्री ज्ञानदेव शिर्के, जिल्हा उपाध्यक्ष सौ श्रेया कुंटे, तालुका महिला मोर्चा अध्यक्षा सौ अपर्णा सुटे,शिक्षण सेल चे तालुका उपाध्यक्ष श्री धनराज उमाळे, तालुका क्रीडा संयोजक श्री शेखर गोळे, श्री विवेक रावकर, युवा मोर्चा उपाध्यक्ष श्री सागर शिर्के, श्री तीरथ पोलसानी, श्री अंकुश सुटे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us