*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे.
*कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;
प्रतिनिधी / तळा-किशोर पितळे
भारतीय जनता पक्षाच्या संघटनात्मक फेरबदलाला वेग आला असून पक्षाच्या महत्त्वाच्या जबाबदाऱ्या अनुभवी आणि सक्रिय नेतृत्वाकडे सोपविण्यात आल्याने तळा भाजपमध्ये नव्या उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कैलास पायगुडे यांच्याकडे भाजपच्या तळा तालुक्याची धुरा, तर ॲड. चेतन चव्हाण यांची शहराध्यक्षपदी आणि ॲड.निलेश रातवडकर यांची जिल्हा ओबीसी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.अलिबाग येथे जिल्हा कार्यकारणी च्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला यावेळी भाजप प्रदेश अध्यक्ष रविन्द्र चव्हाण, रायगड जिल्हा अध्यक्ष धैर्यशील पाटील,श्रीवर्धन मतदार संघ संपर्क प्रमुख प्रशांत शिंदे,जिल्हा महिला चिटणीस हेमा मानकर,तळा तालुका प्रभारी अध्यक्ष ॲड नीलेश रातवडकर, मा.अध्यक्ष कैलास पायगुडे, शहर अध्यक्ष राकेश कासार, युवक अध्यक्ष वैभव कदम, शहर युवक अध्यक्ष सुयोग बारटक्के, महादेव आर्डे, मोरेश्वर गोरीवले,अमोल हटकर आदी मान्यवर उपस्थित होते.
*अँड.चेतन चव्हाण,अँड निलेश रातवडकर मोठी महत्त्वाची जबाबदारी *आगामी नगरपंचायत व ग्रामपंचायतीच्या निवडणूक पार्श्वभूमीवर नियुक्ती झाल्याचे समजते अँड. चेतन चव्हाण यांची शहराध्यक्ष पदी आणि ॲड. निलेश रातवडकर यांची जिल्हा ओबीसी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. शेतकरी संघटनेचे सचिव सामाजिक कार्यकर्ते व गिरणे ग्रामपंचायत भाजपची पहिली आणण्यात यशस्वी झाले होते या माध्यमातून तळागाळात शासकीय सोयी सुविधा उपलब्ध करूनविकास घडवून आणला होता अनेक पुरस्कार ग्रामपंचायतीला प्राप्त करून दिले. रायगड जिल्ह्यात एक नंबरची ग्रामपंचायत ठरली.ग्रामीण भागात पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी पुन्हा तालुक्याची जबाबदारी दिली आहे.कैलास पायगुडे यांच्या भाजप मध्ये पुनरागमनामुळे शहरासह ग्रामीण भागात भाजपला नवी ताकद मिळेल असा विश्वास व्यक्तकेला जात आहे. ॲड.चेतन चव्हाणतळानगरपंचायतीचे नगरसेवक होते प्रशासनाचा दाडंगा अनुभव कायदा चे ज्ञान,आणी तरुण व्यक्तीमत्व त्यांच्या रुपाने यांची शहराध्यक्षपदी निवड झाल्याने शहर आणी तालुक्यात चांगली पक्कड बसेल याची खात्री वाटते.अँड रातवडकर प्रभारी तालुका अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली होती यांची जिल्हा ओबीसी अध्यक्षपदी निवड करून त्यांना बढती देण्यात आली आहे. जिल्हापातळीवर ओबीसी समाजाचे संघटन मजबूत करण्याची महत्त्वाची जबाबदारी त्यांच्या खांद्यावर दिली आहे.या नियुक्त्यांमुळे तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. तळा तालुक्यात भाजप शहरात व ग्रामीण भागात कमळ फुलवेलअसा राजकीय गोटातून व्यक्त केले जात आहे.