Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»निलेश मांदाडकर यांची म्हसळा तालुका भाजप अध्यक्षपदी निवड
राजकारण

निलेश मांदाडकर यांची म्हसळा तालुका भाजप अध्यक्षपदी निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*निलेश मांदाडकर यांची म्हसळा तालुका भाजप अध्यक्षपदी निवड*

म्हसळा (प्रतिनिधी)
म्हसळा तालुक्यातील सक्रिय कार्यकर्ते निलेश परशुराम मांदाडकर यांची भारतीय जनता पक्षाच्या म्हसळा तालुका प्रभारी अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीमुळे तालुक्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

निलेश मांदाडकर हे सामाजिक, शैक्षणिक व राजकीय क्षेत्रात अनेक वर्षांपासून सक्रिय असून त्यांनी विविध पदांवर कार्य करत संघटनात्मक कामाला बळ दिले आहे. त्यांनी आतापर्यंत अनेक महत्त्वाची पदे भूषविली असून त्यामध्ये खरसई शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष, मेंदडी गण हिंदू संघटनेचे अध्यक्ष, खरसई येथील सोमजाई देवी मंदिर ट्रस्ट आणि म्हसळा तालुका फार्मर प्रोड्युसर कंपनी लिमिटेडचे अध्यक्ष म्हणून जबाबदारी सांभाळली आहे. याशिवाय महाड येथील विनय शिक्षण संस्थेचे न्यू इंग्लिश स्कूल, खरसई संचालक, रायगड जिल्हा भाजप युवा मोर्चाचे उपाध्यक्ष, खरसई विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे उपाध्यक्ष आणि म्हसळा हॉटेल संघटनेचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे. २००२ ते २०२६ या प्रदीर्घ काळात त्यांनी खरसई ग्रामपंचायतीचे सदस्य आणि माजी सरपंच म्हणूनही ग्रामीण विकासात मोलाचे योगदान दिले आहे. तसेच मेंदडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या रुग्ण समितीचे सदस्य म्हणूनही ते कार्यरत आहेत.

भाजप संघटनेत काम करताना निलेश मांदाडकर यांनी पक्षवाढीसाठी सातत्याने प्रयत्न केले आहेत. त्यांच्या या दांडग्या अनुभवामुळे म्हसळा तालुक्यात पक्ष संघटना अधिक मजबूत होईल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे. ही निवड दक्षिण रायगड जिल्हाध्यक्ष मा. खासदार धैर्यशील पाटील, रायगड जिल्हा सरचिटणीस सतीश धारप, श्रीवर्धन विधानसभा अध्यक्ष प्रशांत शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष नाना महाले, जिल्हा युवा मोर्चा अध्यक्ष श्री निलेश थोरे,जिल्हा चिटणीस व माजी अध्यक्ष शैलेशकुमार पटेल, माजी तालुकाध्यक्ष तुकाराम पाटील, तालुका उपाध्यक्ष भालचंद्र करडे आणि तालुक्यातील विविध सेलच्या अध्यक्षांच्या माध्यमातून करण्यात आली आहे. त्यांच्या या निवडीबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत असून पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात येत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us