Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»शैक्षणिक»खा. सुनील तटकरे यांच्यामार्फत पोलादपूर तालुक्यातील दूर्गम डोंगराळ गावापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न-आ.अनिकेत तटकरे पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप
शैक्षणिक

खा. सुनील तटकरे यांच्यामार्फत पोलादपूर तालुक्यातील दूर्गम डोंगराळ गावापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न-आ.अनिकेत तटकरे पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

खा. सुनील तटकरे यांच्यामार्फत पोलादपूर तालुक्यातील दूर्गम डोंगराळ
गावापर्यंत विविध योजनांचा लाभ देण्याचा प्रयत्न-आ.अनिकेत तटकरे
पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून
गरजू विद्यार्थी विद्यार्थिनींना सायकलींचे वाटप

पोलादपूर (शैलेश पालकर)- रायगड लोकसभेचे खासदार सुनील तटकरे साहेबांच्या माध्यमातून इ आय एल कंपनीच्या सीएसआर फंडातून कोल्हापूर तालुक्यात 306 विद्यार्थी विद्यार्थिनींना मोफत सायकलीचे वाटप केले जात असून भविष्यात पोलादपूर तालुक्यात एमपीएससी यूपीएससी आणि दहावी बारावीनंतरच्या स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्र सुरू करण्यात येणार आहे; ज्याच्या माध्यमातून तालुक्यात अनेक सरकारी कर्मचारी व राजपत्रित अधिकारी तयार व्हावेत आयपीएस आयएएस अधिकारी व्हावेत, असा प्रयत्न येत्या काही दिवसात केला जाईल अशी ग्वाही कोकण विभागीय स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विधान परिषद मतदार संघातील नवनिर्वाचित बिनविरोध सदस्य आ. अनिकेत तटकरे यांनी दिली.
पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून गरजू विद्यार्थी आणि विद्यार्थिनींना सायकलींचे मोफत वाटप करण्यात आले. याप्रसंगी आ. अनिकेत तटकरे बोलत होते. यावेळी व्यासपीठावर युवा नेते श्रीयश माणिकराव जगताप, जिल्हा प्रवक्ते धनंजय देशमुख, तालुका अध्यक्ष विठोबा पार्टे, शहर महिला अध्यक्षा सारिका विचारे, शहराध्यक्ष अजित खेडेकर, रामदास सकपाळ, ज्येष्ठ नेते चंद्रकांतबुवा जाधव, इंग्लिश मिडीयम स्कूलचे संस्थापक अध्यक्ष शंकरराव महाडिक तसेच पोलादपूर नगरपंचायतीचे विरोधी पक्ष नेते दिलीप भागवत, नगरसेवक स्वप्निल भुवड, नगरसेविका श्रावणी शहा, गरुड, गणेश घाटे व आशा गायकवाड व अन्य मान्यवर उपस्थित होते.
निवडणूक बिनविरोध झाल्याने दुसऱ्या टर्मच्या आमदारकीच्या काळातील पहिला सार्वजनिक कार्यक्रम पोलादपूर तालुक्यात होत असल्याचा अभिमान व्यक्त करीत आ.अनिकेत तटकरे यांनी पोलादपूर तालुक्यातील विविध प्रश्नी पाठपुरावा करण्याची ऊर्जा या रायगड जिल्ह्यातील सर्वाधिक शहिद जवान, सेवानिवृत्त सैनिक, सरकारी कर्मचारी असलेल्या तालुक्यातून मिळत असल्याचे सांगून सायकल वाटपातून एखादा विद्यार्थी अथवा विद्यार्थिनीं परिश्रमाने आयएएस उत्तीर्ण झालेले भविष्यात पाहण्याचा योग यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली.
प्रारंभी प्रास्ताविकात अजय सलागरे यांनी, पोलादपूर तालुक्यात खा.तटकरे, ना.अदिती तटकरे यांच्या माध्यमातून झालेल्या मदतीसह विकासकामांचा ओघ जनतेने पाहिला आहे. आता वैयक्तिक लाभाच्या योजना तसेच पोलादपूर तालुक्याचे जीवनमान उंचावण्यासाठीचे ठोस प्रयत्न अनुभवायाचे असल्याचे सांगितले. याप्रसंगी पोलादपूर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व नगरपंचायतीतील राष्ट्रवादी काँग्रेस नगरसेवकांतर्फे आ.अनिकेत तटकरे यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी धनंजय देशमुख, दिलीप भागवत, श्रीयश जगताप यांनी समयोचित भाषणे केली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.

June 28, 2026

भविष्यातील स्पर्धा लक्षात घेऊन विद्यार्थ्यांना योग्य दिशा देणे ही काळाची गरज” – आमदार अनिकेत तटकरे

June 27, 2026

रोह्यातील अर्णव सलागरेची राष्ट्रीय स्तरावर झेप राष्ट्रीय गणित स्पर्धा २०२६ मध्ये २०० पैकी २०० गुणांसह प्रथम क्रमांक

June 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us