Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»क्रीडा»कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’ सोमवारी कामोठेत कुस्तीचा थरार
क्रीडा

कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’ सोमवारी कामोठेत कुस्तीचा थरार

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 16, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कामोठेत रंगणार ‘मिनी महाराष्ट्र केसरी’ सोमवारी कामोठेत कुस्तीचा थरार

पनवेल (प्रतिनिधी) भारतीय जनता पार्टीचे युवा नेते, पनवेलमहापालिकेचे माजी सभागृहनेते व विद्यमान नगरसेवक परेश ठाकूरयांच्या वाढदिवसाचे औचित्याने दरवर्षीप्रमाणे यंदाहीक्रीडाप्रेमींसाठी भारतीय जनता युवा मोर्चा कामोठे आणि रायगडजिल्हा कुस्ती असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने सोमवार, दि. १८ मे २०२६ रोजी कामोठे मधील सेक्टर ०६ येथील लोकनेतेरामशेठ ठाकूर विद्यालयाच्या भव्य मैदानावर “मा.श्री.परेशशेठठाकूर केसरी २०२६” या भव्य जंगी कुस्ती सामन्यांचे आयोजनकरण्यात आल्याची माहिती आज(दि. १५) येथे आयोजितकरण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत आली. महाराष्ट्र केसरी प्रमाणे या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपात आयोजन असल्याने कामोठेत मिनी महाराष्ट्र केसरी रंगणार आहे आणि त्या अनुषंगाने कुस्तीचा थरार अनुभवायला मिळणार आहे. 

         पनवेल तालुका व शहर भाजपच्या मध्यवर्ती कार्यालयात भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पत्रकार परिषदेस भाजपचे राज्य परिषद सदस्य अरुणशेठ भगत, महापौर नितीन पाटील, रायगड जिल्हा कुस्ती असोसिएशनचे अध्यक्ष, पनवेल महापालिकेचे नगरसेवक परेश ठाकूर, नगरसेवक दिनेश खानावकर, सुमित झुंझारराव,  आयोजक पनवेल महापालिकेचे नगरसेवक हॅप्पी सिंग आणि भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष मयुरेश नेतकर  कुस्ती प्रशिक्षक रुपेश पावशे, कामोठे युवा मोर्चा अध्यक्ष तेजस जाधव, यांच्यासह पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते.  

          कुस्ती सामन्यांच्या संदर्भात पुढे माहिती देताना परेश ठाकूर यांनी सांगितले कि, या सामन्यांचे उद्घाटन माजी खासदारलोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते होणार असून यावेळी भाजपचेमहाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण, राज्याचे मत्स्यव्यवसायआणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे, भारतीय जनता युवा मोर्चाचेप्रदेशाध्यक्ष कृष्णराज महाडिक, आमदार महेश लांडगे यांची प्रमुखमान्यवर म्हणून उपस्थिती असणार असून प्रमुख पाहुणे म्हणूनभाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव आमदार प्रशांत ठाकूर, आमदारमहेश बालदी, आमदार मंदाताई म्हात्रे, शिक्षक मतदार संघाचेआमदार ज्ञानेश्वर म्हात्रे, ज्येष्ठ नेते जे.एम. म्हात्रे,  भाजपचेजिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, राज्य परिषद सदस्य अरुणशेठभगत, महापौर नितीन पाटील, माजी विरोधी पक्षनेते प्रितम म्हात्रे,सभागृहनेते प्रकाश बिनेदार, स्थायी समिती सभापती बबनमुकादम, युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष आनंद ढवळे, भाजपचे कामोठेमंडल अध्यक्ष विकास घरत, खारघर मंडल अध्यक्ष प्रवीण पाटील,कळंबोली  मंडल अध्यक्ष अमर पाटील, पनवेल शहर मंडल अध्यक्षसुमित झुंझारराव, नविन पनवेल  मंडल अध्यक्ष दशरथ म्हात्रे, उत्तर मंडल अध्यक्ष दिनेश खानावकर, पूर्व  मंडल अध्यक्ष भूपेंद्र पाटील, पश्चिम  मंडल अध्यक्ष रुपेश धुमाळ यांच्यासह स्थानिकलोकप्रतिनिधींची उपस्थिती असणार आहे. 

         वाढदिवसानिमित्त कार्यक्रमातून प्रेरणा मिळावी यासाठी सामाजिक उपक्रम राबविले जातात. पनवेलमधील नागरिकांनाराष्ट्रीय स्तरावरील कुस्ती सामने प्रत्यक्ष अनुभवता यावेत, महाराष्ट्राची पारंपरिक कुस्ती संस्कृती पुढील पिढीपर्यंत पोहोचावीआणि नवोदित खेळाडूंना प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या स्पर्धेचेआयोजन सातत्याने करण्यात येत आहे. दरवर्षी हजारो क्रीडाप्रेमीया स्पर्धेला उपस्थित राहून मातीतील थरार अनुभवतात.  या स्पर्धेतमहाराष्ट्रासह पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश आणि दिल्ली येथीलनामांकित मल्ल सहभागी होणार आहेत. हिंद केसरी, महाराष्ट्रकेसरी तसेच महिला कुस्तीपटूंचे विशेष सामने हे यंदाच्या स्पर्धेचेप्रमुख आकर्षण असणार आहे. या स्पर्धेतील एकूण विजेत्यांना १५लाख ५५ हजार ५५५ रुपयांची पारितोषिके असणार असून यामध्येप्रामुख्याने पुरुष गटात रुस्तम ए हिंद पै. सिकंदर शेख विरुद्धपंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै. लाली चमकोर, उपमहाराष्ट्र केसरीपै.किरण भगत विरुद्ध पंजाबचा सुप्रसिद्ध मल्ल पै.बागा सिंघ, ट्रिपल महाराष्ट्र केसरी पै.विजय चौधरी विरुद्ध हिंद केसरी पै.संदीपकुमार, महाराष्ट्र केसरी  पै. दादा शेळके विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरीपै.माउली कोकाटे यांचे तर महिला गटात पै.अमेघा घरत विरुद्धराष्ट्रीय पदक विजेती पै.एकता शर्मा, राष्ट्रीय पदक विजेतीपै.पलक यादव विरुद्ध उपमहाराष्ट्र केसरी पै.वेदांतीका पवार आणिनेपाळची सुप्रसिद्ध मल्ल पै.रुबी थापा विरुद्ध उत्तराखंडची सुप्रसिद्धपै. कोमल यांच्यामध्ये सामने होणार असल्याचे परेश ठाकूर यांनी सांगितले. आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळणाऱ्या मल्लांचा या स्पर्धेत सहभाग असून एकूण ७५ सामने होणार असून स्थानिक मल्लांनाही प्राधान्य देण्यात आले आहे. दर्जेदार मैदान, प्रशस्त प्रेक्षक गॅलरी, वैद्यकीय तसेच आवश्यक अशा सर्व सुविधा या ठिकाणी असणार असल्याची माहिती परेश ठाकूर यांनी यावेळी दिली.

          परेश ठाकूर यांनी पनवेल आणि रायगड परिसरातीलसामाजिक, शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रात सातत्याने उल्लेखनीयकार्य केले आहे. युवकांना सक्षम व्यासपीठ मिळावे, ग्रामीणभागातील प्रतिभेला संधी मिळावी आणि समाजात सकारात्मकऊर्जा निर्माण व्हावी, या उद्देशाने त्यांनी विविध उपक्रमांना कायमप्रोत्साहन दिले आहे. पनवेल परिसरातील युवकांना सामाजिककार्य, नेतृत्व आणि संघटन कौशल्याची प्रेरणा देण्यात त्यांचा मोठावाटा राहिला आहे.  विविध कला, क्रीडा, सांस्कृतिक आणिसामाजिक उपक्रमांमध्ये त्यांचा सहभाग नेहमीच उल्लेखनीयराहिला आहे. सर्वसामान्य नागरिकांशी जुळलेली आपुलकी आणिसमाजाशी असलेले घट्ट नाते हीच त्यांची खरी ओळख मानलीजाते. लोकनेते रामशेठ ठाकूर यांचा सामाजिक वारसा समर्थपणेपुढे नेत असताना सामाजिक बांधिलकी, जनसंपर्क आणिमाणुसकीची जपणूक हा परेश ठाकूर यांचा पिंडआहे. “समाजातील प्रत्येक घटकाला सोबत घेऊन विकास आणिसंस्कारांची परंपरा जपणे” ही त्यांची भूमिका अनेक उपक्रमांतूनसातत्याने दिसून येते. त्यामुळेच पनवेल परिसरात त्यांच्याबद्दलविशेष आत्मीयता आणि विश्वास आहे. समाजोपयोगीउपक्रमांमध्ये त्यांनी नेहमीच पुढाकार घेतला आहे. त्यामुळे  परेशठाकूर यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात येणारी हीस्पर्धा आज पनवेल तालुक्यातील एक प्रतिष्ठेचा आणि सर्वांच्याआकर्षणाचा क्रीडा महोत्सव बनली आहे. कुस्ती या महाराष्ट्राच्यापारंपरिक खेळाबद्दल असलेले त्यांचे विशेष प्रेम, खेळाडूंप्रतीअसलेला जिव्हाळा आणि क्रीडा क्षेत्राला दिलेले सातत्यपूर्णप्रोत्साहन यामुळे “मा.श्री. परेशशेठ ठाकूर केसरी” कुस्ती स्पर्धेलाराज्यभरात वेगळी ओळख निर्माण झाली आहे. कुस्ती हा केवळखेळ नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचा आणि परंपरेचा आत्मा आहे,ही भावना जपत परेश ठाकूर यांनी गेल्या अनेक वर्षांपासून कुस्ती

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोहा तालुक्यातील अनुराज ठाकूरची रायगड जिल्हा कुमार गट खो-खो संघात सलग दुसऱ्या वर्षी निवड

May 24, 2026

रायगडातील दानशूर व्यक्तिमत्व प्रमोद शेठ म्हसकर व राजकारणातील डॅशिंग नेतृत्व पंचायत समिती सदस्य सुरेश जी मगर पुरस्कृत.

April 30, 2026

महाराष्ट्र राज्य अजिंक्यपद निवड चाचणी कबड्डी स्पर्धा; २५ मार्चपासून रायगड जिल्हा कबड्डी संघाचे सराव शिबीर

March 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us