Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»तरुण नेतृत्वाचा उदय : संजय मांडलूस्कर उपसभापतीपदी; कुणबी समाजाचा अभिमान वाढला – सुनील ठाकूर
राजकारण

तरुण नेतृत्वाचा उदय : संजय मांडलूस्कर उपसभापतीपदी; कुणबी समाजाचा अभिमान वाढला – सुनील ठाकूर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 31, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

तरुण नेतृत्वाचा उदय : संजय मांडलूस्कर उपसभापतीपदी; कुणबी समाजाचा अभिमान वाढला – सुनील ठाकूर

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

 

रोहा तालुक्यातील राजकारणात नव्या दमाच्या नेतृत्वाचा उदय होत असून, पुई गावचे सुपुत्र संजय मांडलूस्कर यांची अल्पवयातच पंचायत समितीच्या उपसभापतीपदी झालेली निवड ही विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. त्यांच्या या यशामुळे कुणबी समाजाचा नावलौकिक उंचावला असल्याचे मत कुणबी समाज उन्नती संघ, मुंबई शाखेचे उपाध्यक्ष सुनील ठाकूर यांनी व्यक्त केले.
सामान्य कुटुंबातून पुढे आलेल्या संजय मांडलूस्कर यांनी कोणताही राजकीय वारसा नसताना केवळ जिद्द, चिकाटी आणि गावाच्या विकासाची तळमळ याच्या जोरावर राजकारणात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. पुई ग्रामपंचायत ताब्यात घेण्यासाठी त्यांनी ग्रामस्थांना एकत्र आणत संघर्षमय वाटचाल केली. या प्रयत्नांना यश मिळत आज गावात विकासाची गती वाढलेली दिसून येत आहे.
सुनील ठाकूर यांनी सांगितले की, “पुई हे माझे सासरवाडीचे गाव असल्याने आणि अनेक वर्ष कोलाड परिसरात वास्तव्यास असल्यामुळे संजय मांडुलूस्कर यांचा प्रवास मी जवळून पाहिला आहे. त्यांनी अत्यंत साध्या परिस्थितीतून मोठी झेप घेतली आहे.”
तटकरे कुटुंबीयांनी युवा कार्यकर्त्यांवर दाखवलेला विश्वासही यानिमित्त अधोरेखित झाला आहे. खासदार सुनील तटकरे, मंत्री आदिती तटकरे तसेच माजी आमदार अनिकेत तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली पुई गावात विकासकामांना गती मिळाल्याचे चित्र आहे.
“राजकारणात निष्ठा आणि जनसेवेची भावना असेल, तर कोणत्याही सामान्य तरुणालाही मोठी पदे मिळू शकतात, हे संजय मांडलूस्कर यांच्या निवडीने सिद्ध झाले आहे,” असेही ठाकूर यांनी नमूद केले.
संजय मांडुलूस्कर यांच्यासारख्या होतकरू आणि समाजाभिमुख तरुणाला उपसभापतीपद मिळाल्याने ग्रामीण भागाच्या विकासाला चालना मिळेल, तसेच कुणबी समाजाच्या प्रश्नांनाही योग्य न्याय मिळेल, असा विश्वास व्यक्त करत सुनील ठाकूर यांनी त्यांच्या निवासस्थानी भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

September 13, 2026

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us