Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»मनमिळावू स्वभावाच्या अनिता सुर्वे काळाच्या पडद्याआड ; परिसरात शोळकळा
ताज्या बातम्या

मनमिळावू स्वभावाच्या अनिता सुर्वे काळाच्या पडद्याआड ; परिसरात शोळकळा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Screenshot
Share
WhatsApp Facebook Twitter

मनमिळावू स्वभावाच्या अनिता सुर्वे काळाच्या पडद्याआड ; परिसरात शोळकळा

प्रतिनिधी – शुभ्रा आडाव न्हावे

रेवदंडा परिसरातील सर्वांच्या मनात आपलेपणाचे स्थान निर्माण करणाऱ्या कै. अनिता अनंत सुर्वे यांचे अल्पशा आजाराने उपचारादरम्यान रामनवमीच्या पावन दिवशी, गुरुवार दि. २६ मार्च रोजी जिल्हा रुग्णालय, अलिबाग येथे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच कुटुंबीयांसह संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
शांत, संयमी आणि मनमिळावू स्वभावामुळे कै. सुर्वे या सर्वांच्या विशेष जिव्हाळ्याच्या होत्या. कोणालाही मदतीची गरज भासली की तत्परतेने पुढे सरसावणे, प्रत्येकाशी आत्मीयतेने संवाद साधणे आणि नातेसंबंध जपण्याची त्यांची वृत्ती यामुळे त्यांनी समाजात वेगळे स्थान निर्माण केले होते. त्यांच्या साधेपणातही माणुसकीची खरी श्रीमंती दिसून येत असे.
त्यांच्या अकस्मात जाण्यामुळे परिसरात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, दोन मुली, सून, जावई तसेच नातू-नाती असा मोठा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईक व मित्रपरिवार त्यांना धीर देत आहेत.
कै. अनिता सुर्वे यांच्यावर गुरुवार, दि. २७ मार्च रोजी सकाळी १० वाजता अमर धाम स्मशानभूमी, रेवदंडा येथे अंत्यसंस्कार पार पडले. पुढील दशक्रिया विधी शनिवार, दि. ४ एप्रिल रोजी होणार असून दिवसकार्य मंगळवार, दि. ७ एप्रिल रोजी साई छाया सोसायटी, बँक ऑफ इंडिया, रेवदंडा येथे आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमावेळी दुखवटा शिकारला जाणार नसल्याचे कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.
ईश्वर त्यांच्या आत्म्यास चिरशांती देवो आणि त्यांच्या कुटुंबीयांना या दुःखातून सावरण्याची शक्ती देवो, अशा भावपूर्ण श्रद्धांजली सर्व स्तरांतून व्यक्त होत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us