Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक
राजकारण

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार! खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरSeptember 13, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यात काँग्रेसचा सरकारविरोधात एल्गार!

खड्डे, वाहतूक कोंडी, पेपरफुटीवर सत्ताधाऱ्यांना घेरणार; राजाभाऊ ठाकूर यांच्या उपस्थितीत काँग्रेसची आक्रमक बैठक

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा तालुक्यातील जनतेच्या ज्वलंत प्रश्नांना राजकीय मुद्द्यांचे स्वरूप देत सत्ताधारी सरकारला घेरण्यासाठी काँग्रेसने आता आक्रमक पवित्रा घेण्याचे संकेत दिले आहेत. मुंबई-गोवा महामार्गावरील जीवघेणे खड्डे, सातत्याने होणारी वाहतूक कोंडी, रस्त्यांची दुरवस्था तसेच विद्यार्थ्यांच्या भवित्यावर परिणाम करणाऱ्या पेपरफुटीच्या प्रश्नावर आगामी काळात आंदोलनाची धार अधिक तीव्र करण्याची रणनीती काँग्रेसने आखली आहे.
रायगड जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि रोहा तालुका काँग्रेस अध्यक्ष मितेश कल्याणी यांच्या अध्यक्षतेखाली रोहा येथे तालुका पदाधिकारी व कार्यकर्त्यांची आढावा बैठक पार पडली. या बैठकीत जनतेच्या प्रश्नांवरून सरकारला जाब विचारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
महामार्गावरील खड्ड्यांवर काँग्रेसचा निशाणा
मुंबई-गोवा महामार्गाचे काम वर्षानुवर्षे सुरू असतानाही नागरिकांच्या अडचणी कमी झालेल्या नाहीत. उलट खड्डे, वाहतूक कोंडी आणि अपुऱ्या रस्ते सुविधांमुळे वाहनचालक, व्यापारी, विद्यार्थी तसेच दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. सरकारकडून वारंवार आश्वासने दिली जात असली तरी प्रत्यक्ष परिस्थितीत बदल किती झाला, असा सवाल काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी उपस्थित केला.
जनतेच्या या प्रश्नांना केवळ निवेदनापुरते मर्यादित न ठेवता गरज पडल्यास रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याची भूमिका बैठकीत व्यक्त करण्यात आली.
पेपरफुटीवरून सरकारला घेरणार
विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित पेपरफुटीच्या घटनांवरही बैठकीत तीव्र चिंता व्यक्त करण्यात आली. वर्षभर अभ्यास करून परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर परीक्षा व्यवस्थेतील गैरप्रकारांमुळे पाणी फेरले जात असेल, तर ही गंभीर बाब आहे. परीक्षा प्रक्रिया पारदर्शक आणि सुरक्षित करण्यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी काँग्रेसने केली.
गावागावांत जनसंपर्क, प्रश्नांवर थेट संघर्ष
महागाई, रस्त्यांची दुरवस्था, वाहतूक कोंडी, विद्यार्थ्यांचे प्रश्न आणि प्रशासनाच्या कारभाराबाबत नागरिकांमध्ये नाराजी असल्याचा दावा काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी केला. ही नाराजी संघटित करून जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचा निर्धार बैठकीत करण्यात आला.
आगामी काळात गावागावांत जनसंपर्क वाढवून नागरिकांच्या समस्या जाणून घेणे, त्या प्रशासनाच्या निदर्शनास आणून देणे आणि प्रश्न सुटले नाहीत तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारणे, अशी भूमिका काँग्रेसकडून घेण्यात येणार असल्याचे संकेत बैठकीतून मिळाले.
‘फक्त बैठका नकोत, जनतेच्या प्रश्नांसाठी रस्त्यावर उतरा’
जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी रोहा तालुक्यात काँग्रेस संघटना अधिक मजबूत करण्यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी एकजुटीने काम करण्याचे आवाहन केले. समाजसेवा आणि सर्वसामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास काँग्रेस कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. पक्षाच्या बैठका घेण्यापेक्षा जनतेच्या प्रत्यक्ष प्रश्नांमध्ये उतरून त्यांना न्याय मिळवून देणे हीच काँग्रेस कार्यकर्त्यांची खरी जबाबदारी असल्याचे त्यांनी सांगितले.
बैठकीला रायगड जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर, रोहा तालुकाध्यक्ष मितेश कल्याणी, श्रीवर्धन विधानसभा मतदारसंघ अध्यक्ष विलास सुर्वे, रायगड जिल्हा उपाध्यक्ष अशपाक पानसरे, जिल्हा सरचिटणीस सुनील देशमुख, जिल्हा खजिनदार रामप्रकाश कुशवाह, रोहा तालुका अल्पसंख्याक अध्यक्ष बिलाल कुरेशी, तालुका कार्यकारी अध्यक्ष फैजल अधिकारी, सोशल मीडिया अध्यक्ष आदिल पानसरे, तालुका कार्यकारी अध्यक्ष विनोद सावंत, पदाधिकारी अशोक कांबळे, ज्येष्ठ कामगार नेते बशीर भुरे, सदस्य हरिओम टाळकुटे यांच्यासह असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
बैठकीच्या शेवटी जिल्हाध्यक्ष राजाभाऊ ठाकूर यांनी कार्यक्रमाला उपस्थित राहिलेल्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांचे आभार मानले. रोह्यात जनतेच्या प्रश्नांवरून काँग्रेस आता आक्रमक मैदानात उतरणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

*तळा तालुक्यात भाजपला पुन्हा चांगले दिवस येण्याची दाट शक्यता .राजकीय वर्तुळातून व्यक्त होत आहे. *कैलास पायगुडे यांच्या हाती तालुक्याची धुरा;

September 12, 2026

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026

*रोहा तालुक्यात शिवसेनेची दमदार वाटचाल; युवासेनेच्या तालुका व शहर प्रमुखपदी रोशन पवार, राहुल गुरव*

August 26, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us