Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक
  • *रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*
  • दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
  • रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.
  • *द.ग.तटकरे महाविद्यालयाचे वादविवादात मुंबई विद्यापीठात सुवर्ण यश.महाविद्यालयाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा रोवला तुरा *ध्रुव राऊत ठरला मुंबई विद्यापीठाचा सर्वोत्कृष्ट वक्ता
  • तळा शिवसेना तालुका प्रमुख प्रद्युम्नजी ठसाळ यांची फेर निवडीने शिवसैनिकात चैतन्य.
  • समाजसेवेच्या कार्याचा शिर्डीत गौरव; डॉ. फरीद चिमावकर यांना राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र गौरव’
  • निडी येथील पंकज मढवी यांची मृत्यूशी झुंज अखेर संपली वीज वितरणच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांकडून हळहळ; कुटुंबीयांना मदतीसाठी प्रयत्न
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राजकारण»*रोहा तालुक्यात शिवसेनेची दमदार वाटचाल; युवासेनेच्या तालुका व शहर प्रमुखपदी रोशन पवार, राहुल गुरव*
राजकारण

*रोहा तालुक्यात शिवसेनेची दमदार वाटचाल; युवासेनेच्या तालुका व शहर प्रमुखपदी रोशन पवार, राहुल गुरव*

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

*रोहा तालुक्यात शिवसेनेची दमदार वाटचाल; युवासेनेच्या तालुका व शहर प्रमुखपदी रोशन पवार, राहुल गुरव*

रोहा:समीर बामुगडे

रोहा | प्रतिनिधी : रोहा तालुक्यात शिवसेनेची संघटनात्मक ताकद दिवसेंदिवस वाढत असून, पक्षाने आता युवाशक्तीला संघटित करण्यावर विशेष भर दिला आहे. शिवसेना मुख्य नेते तथा मुख्यमंत्री ना. श्री. एकनाथजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली रोहा तालुक्यात पक्षबळकटीकरणाला वेग आला असून, युवासेनेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे संघटनेत नवचैतन्य निर्माण झाले आहे.

रायगड जिल्ह्याचे पालकमंत्री ना. श्री. भरतशेठ गोगावले, अलिबाग-मुरुड विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री. महेंद्रशेठ दळवी तसेच युवासेना कोअर कमिटी सदस्य, कोकण विभाग सचिव आणि रायगड जिल्हा परिषद सदस्य श्री. विकास भरतशेठ गोगावले यांच्या विशेष उपस्थितीत व मार्गदर्शनाखाली रोहा तालुक्यातील युवासेनेच्या नवीन पदाधिकाऱ्यांची अधिकृत घोषणा करण्यात आली.

यामध्ये श्री. रोशन धर्मा पवार यांची युवासेना तालुका प्रमुख, रोहा तर श्री. राहुल मनोज गुरव यांची युवासेना शहर प्रमुख, रोहा शहर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या नियुक्त्यांमुळे रोहा तालुका आणि शहरातील युवासेनेच्या संघटनात्मक विस्ताराला मोठी चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.

वंदनीय हिंदूहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत धर्मवीर आनंद दिघे यांच्या शिकवणीनुसार तळागाळातील तरुणांना संघटित करण्याची जबाबदारी या दोन्ही युवा पदाधिकाऱ्यांवर सोपविण्यात आली आहे. आगामी काळात युवकांचे प्रश्न, रोजगार, शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि स्थानिक पातळीवरील विविध प्रश्नांसाठी युवासेना अधिक आक्रमकपणे काम करणार असल्याचे संकेत या नियुक्त्यांमधून मिळत आहेत.

नवनियुक्त तालुका प्रमुख रोशन पवार आणि शहर प्रमुख राहुल गुरव यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, पालकमंत्री भरतशेठ गोगावले, आमदार महेंद्रशेठ दळवी आणि विकास गोगावले यांचे आभार मानले. रोहा तालुका व शहरात युवासेनेचे संघटन अधिक मजबूत करून सर्वसामान्य तरुणांच्या प्रश्नांसाठी सातत्याने आवाज उठविण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला.

दरम्यान, रोहा तालुक्यात शिवसेनेच्या वाढत्या संघटनात्मक हालचालींमुळे आगामी काळात स्थानिक राजकारणात शिवसेनेची ताकद आणखी वाढण्याची शक्यता व्यक्त होत असून, नव्या नियुक्त्यांनंतर कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

राष्ट्रवादीच्या बालेकिल्यात रस्त्याची दैयनीय अवस्था. महागांव पंचक्रोशीतील ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा.

August 26, 2026

*तळा शहरातील पुसाटीवाडी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला ढासळला.शिवसेनेचा मोठा धक्का!

August 18, 2026

रायगडचे पालक मंत्री भरतशेट गोगावले झाल्याने शिवसेना वतीने तळा येथे आनंदोत्सव साजरा.

August 17, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

गणेशभक्तांच्या सेवेसाठी भाजपाचा सेवाभावी पुढाकार! रोह्यात मोफत मिनीडोअर बससेवेचा शुभारंभ; रविंद्र चव्हाणांकडून अमित घाग यांच्या उपक्रमाचे कौतुक

September 11, 2026

*रोहा शहरात गणेशोत्सवानिमित्त भव्य स्वच्छता अभियान; ४२१ श्री सदस्यांच्या श्रमदानातून २७ टन कचरा संकलित*

September 11, 2026

दमखाडी नाल्याच्या दुरुस्तीला अद्याप मुहूर्त नाही! ३० जुलैच्या दुर्घटनेनंतरही काम रखडले; गणेशोत्सव तोंडावर, नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

September 10, 2026

रायगड जिल्ह्याची आपत्ती प्रतिसाद क्षमता बळकट करण्यासाठी रिलायन्स फाउंडेशनकडून बचाव नौका व आपत्कालीन साहित्याचे वितरण.

September 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us