Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
ताज्या बातम्या

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 11, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

शहर बचाव समितीचे नगरपरिषद प्रशासनाला स्मरणपत्र; पाणी, वाहतूक, पार्किंग, स्वच्छता, गटार, भूमिगत वीज आणि आरोग्याच्या प्रश्नांवर ठोस कृती आराखड्याची मागणी!

प्रतिनिधी /गणेश पवार कर्जत 

कर्जत शहरातील नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवरून आता कर्जत शहर बचाव समितीने नगरपरिषद प्रशासनाविरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे.

पाणीपुरवठ्यापासून वाहतूक कोंडीपर्यंत… स्वच्छतेपासून आरोग्य सुविधांपर्यंत… तब्बल ५० नागरी प्रश्न अद्याप प्रलंबित असल्याचा समितीचा दावा आहे.

शहरातील अनियमित आणि गढूळ पाणीपुरवठ्यावर तातडीने उपाययोजना कराव्यात, एक्स्प्रेस फिडर कार्यान्वित करावा, पाण्याच्या टाक्यांची स्वच्छता आणि नियमित पाणी तपासणी करावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

तर दुसरीकडे वाढती वाहतूक कोंडी आणि पार्किंगचा प्रश्न सोडविण्यासाठी अधिकृत पार्किंग व्यवस्था, रिक्षा स्टँड, सिग्नल व्यवस्था आणि कायमस्वरूपी वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्याची मागणी समितीने केली आहे.

कचरा व्यवस्थापन, डंपिंग ग्राउंड, भटक्या कुत्र्यांचा प्रश्न, भूमिगत गटार, भूमिगत वीज, सीसीटीव्ही, सार्वजनिक स्वच्छतागृहे आणि नगरपरिषद प्रशासनातील पारदर्शकता अशा विविध प्रश्नांचाही स्मरणपत्रात समावेश आहे.

यापूर्वी निवेदने, बैठका आणि आंदोलन करून प्रशासनाकडून आश्वासने मिळाली. काही प्रश्न मार्गी लागले असले तरी अनेक महत्त्वाचे प्रश्न अद्याप कायम असल्याचा आरोप समितीने केला आहे.

त्यामुळे आता प्रशासनाला थेट एक महिन्याची डेडलाइन देण्यात आली आहे. या कालावधीत ठोस कार्यवाही झाली नाही, तर आंदोलनाचा मार्ग स्वीकारण्याचा इशारा कर्जत शहर बचाव समितीने दिला आहे.

कर्जतकरांच्या ५० प्रश्नांवर प्रशासन काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us