Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणीत गंभीर अनियमिततेचा आरोप; चौकशीची मागणी
ताज्या बातम्या

अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणीत गंभीर अनियमिततेचा आरोप; चौकशीची मागणी

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरAugust 7, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणीत गंभीर अनियमिततेचा आरोप; चौकशीची मागणी

प्रतिनिधी /रवींद्र लाड

रायगड जिल्ह्यातील म्हसळा तालुक्यातील केल्टे गावातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांच्या खोती जमिनींच्या मोजणी व हद्द कायम करण्याच्या प्रक्रियेत गंभीर अनियमितता झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. या संदर्भात केल्टे ग्रामस्थानी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, फलोउत्पादन मंत्री भरत शेठ गोगावले, महिला व बाल विकास मंत्री, स्थानिक आमदार आदिती तटकरे, स्थानिक खासदार सुनील तटकरे, महसूल सचिव, जिल्हाधिकारी रायगड , पोलीस अधीक्षक रायगड आदिना निवेदन सादर करून संपूर्ण प्रकरणाची स्वतंत्र चौकशी करून दोषींवर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

निवेदनात म्हटले आहे की, खोती जमिनींच्या मोजणी प्रक्रियेदरम्यान अनेक शेतकऱ्यांना कायद्यानुसार पूर्वसूचना (नोटीस) देण्यात आली नाही. काही प्रकरणांमध्ये प्रत्यक्ष मोजणी पूर्ण झाल्यानंतर नोटीस बजावण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे. तसेच संबंधित अभिलेखांमध्ये चुकीचे मोबाईल क्रमांक नोंदविण्यात आल्यामुळे अनेक शेतकऱ्यांना कार्यवाहीची माहितीच मिळाली नसल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

याशिवाय काही शेतकऱ्यांच्या अनुपस्थितीत, त्यांना कोणतीही माहिती किंवा संधी न देता जमिनींची हद्द कायम करण्यात आल्याचा आरोपही करण्यात आला आहे. हद्द कायम करण्याच्या आदेशांवरील स्वाक्षऱ्या, शिक्के तसेच आवश्यक प्रमाणीकरणाबाबतही गंभीर शंका उपस्थित करण्यात आली असून, संबंधित आदेशांच्या प्रती निवेदनासोबत जोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.

संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने न राबविता काही व्यक्तींना अनुचित लाभ मिळेल अशा प्रकारे कार्यवाही करण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे या प्रकरणातील सर्व नोंदी, आदेश, नोटिसा आणि अभिलेखांची स्वतंत्र व निष्पक्ष चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणावी, अशी मागणी करण्यात आली आहे.

शेतकऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात संबंधित जमिनींचे संरक्षण करण्यासाठी तातडीने आवश्यक उपाययोजना करण्यात याव्यात तसेच चौकशीत दोषी आढळणाऱ्या अधिकारी किंवा संबंधित व्यक्तींवर कायद्यानुसार कठोर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली आहे.

दरम्यान, या निवेदनामुळे संबंधित परिसरातील अनुसूचित जातीच्या शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, प्रशासन या तक्रारीची कोणती दखल घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us