Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • यंग युनिटी वेलफेअर असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा
  • लायन्स क्लब कोलाडचा पदग्रहण समारंभ संपन्न , अध्यक्षपदी पत्रकार डॉ. श्याम लोखंडे विराजमान.
  • तळाघर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रुपेश शिंदे यांची बिनविरोध निवड
  • डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर
  • रोह्यात दहीहंडीचा थरार रंगणार! उंचच उंच मानवी मनोरे रचण्यासाठी गोविंदा पथकांचा जोरदार सराव
  • जिल्हास्तरीय मॅरेथॉन स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयातील मुग्धा पाटील, करिष्मा हिरवेची चमकदार कामगिरी !
  • निलेश घाटवळ यांच्या हस्ते नांदगावच्या आदर्श केंद्र शाळेत डिजिटल लॅबचे उद्घाटन
  • रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राज्य»रोह्याची लेक अनघा ठाकूर ‘मोहिनी’ मालिकेत मुख्य भूमिकेत; आज भाऊच्या धक्क्यावर कलाकारांची भेट
राज्य

रोह्याची लेक अनघा ठाकूर ‘मोहिनी’ मालिकेत मुख्य भूमिकेत; आज भाऊच्या धक्क्यावर कलाकारांची भेट

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 22, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोह्यात उत्साहाचे वातावरण; आज रात्री ८ वाजता ‘मोहिनी’ मालिकेची टीम नागरिकांशी संवाद साधणार

रोहा : रोहा शहरासाठी अभिमानाची बाब म्हणजे येथील कु. अनघा ठाकूर हिने मराठी मनोरंजन क्षेत्रात मोठी झेप घेत ‘मोहिनी’ या मालिकेत मुख्य भूमिका साकारली आहे. आपल्या मेहनत, जिद्द आणि अभिनय कौशल्याच्या जोरावर अनघाने छोट्या पडद्यावर आपली ओळख निर्माण केली आहे.


या निमित्ताने ‘मोहिनी’ मालिकेची संपूर्ण टीम आज रात्री ८ वाजता रोह्यातील भाऊच्या धक्क्यावर येणार आहे. या वेळी कलाकार प्रेक्षकांशी संवाद साधणार असून, चाहत्यांना त्यांना प्रत्यक्ष भेटण्याची संधी मिळणार आहे. त्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.

‘मोहिनी’ ही मालिका प्रेम, नातेसंबंध आणि भावनिक कथानकावर आधारित असून, प्रेक्षकांना आकर्षित करणाऱ्या फिल्मी शैलीत सादर केली जाणार आहे. ही मालिका उद्यापासून दररोज संध्याकाळी ७.३० वाजता Colors Marathi या लोकप्रिय वाहिनीवर प्रसारित होणार आहे.

अनघा ठाकूरच्या या यशामुळे रोहा शहराचा मान उंचावला असून, तिच्यावर सर्व स्तरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून तिचे स्वागत करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

रोह्यासारख्या शहरातून मनोरंजन क्षेत्रात यश मिळवणे हे प्रेरणादायी असून, अनघा ठाकूर ही तरुणांसाठी एक आदर्श ठरत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्यातील मंगलवाडी शैक्षणिक संकुलात स्वातंत्र्यदिन उत्साहात; शिक्षण सभापती रविंद्र चाळके यांच्या हस्ते ध्वजारोहण

August 16, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.

August 9, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

यंग युनिटी वेलफेअर असोसिएशनतर्फे स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा

August 16, 2026

लायन्स क्लब कोलाडचा पदग्रहण समारंभ संपन्न , अध्यक्षपदी पत्रकार डॉ. श्याम लोखंडे विराजमान.

August 16, 2026

तळाघर तंटामुक्त समितीच्या अध्यक्षपदी रुपेश शिंदे यांची बिनविरोध निवड

August 16, 2026

डायमंड शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी सहकार्य करणार: समाजसेवक प्रमोद म्हसकर

August 16, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us