Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा रोह्यात तिरंगा रॅलीतून जागर; दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध
ताज्या बातम्या

विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा रोह्यात तिरंगा रॅलीतून जागर; दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 26, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा रोह्यात तिरंगा रॅलीतून जागर; दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा दर्शवत तसेच विद्यार्थ्यांच्या संघर्षातून मिळालेल्या यशाचा आनंद साजरा करण्यासाठी रोहा शहरात रविवारी तिरंगा रॅली उत्साहात पार पडली. विद्यार्थ्यांवरील कारवाईचा निषेध नोंदवत, लोकशाही मूल्ये आणि संविधानिक अधिकारांच्या समर्थनाचा संदेश या रॅलीतून देण्यात आला.
दमखाडी येथील नवरत्न हॉटेल परिसरातून रॅलीला प्रारंभ झाला. विद्यार्थी, युवक, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. सहभागींच्या हातात तिरंगा असून देशभक्तीपर घोषणांनी परिसर दुमदुमून गेला. रॅलीदरम्यान कोणत्याही राजकीय पक्षाचे झेंडे किंवा पक्षीय घोषणा देण्यात आल्या नाहीत. विद्यार्थ्यांच्या एकजुटीचा, संविधानिक मार्गाने झालेल्या संघर्षाचा आणि लोकशाही मूल्यांचा गौरव करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले.
रॅलीनंतर झालेल्या सभेत अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. विद्यार्थ्यांच्या मनोगतामुळे उपस्थितांमध्ये भावनिक वातावरण निर्माण झाले. यावेळी कोमल गायकवाड, अदिती वाटवे, तसनीम म्हैस्कर यांच्यासह अन्य विद्यार्थी वक्त्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांकडे संवेदनशीलतेने पाहण्याची गरज व्यक्त केली. लोकशाहीत शांततामय आंदोलनाचा अधिकार अबाधित राहिला पाहिजे, असे मत त्यांनी मांडले.
तसेच हर्षद साळवी, राजेश काफरे, राजेंद्र जाधव, सौ. रोशन देशमुख आणि ओंकार गुरव यांनीही आपले विचार मांडत विद्यार्थ्यांच्या एकजुटीचे महत्त्व अधोरेखित केले. कार्यक्रमाची सांगता सर्व उपस्थितांनी एकत्रितपणे राष्ट्रगीत गायन करून केली. शांतता, शिस्त आणि देशप्रेमाचा संदेश देणाऱ्या या तिरंगा रॅलीला रोह्यातील विविध क्षेत्रांतील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us