Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांची रेल्वे बोर्डाकडे केली जोरदार पाठपुरावा
ताज्या बातम्या

खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांची रेल्वे बोर्डाकडे केली जोरदार पाठपुरावा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 23, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे प्रवासी संघटनेच्या मागण्यांची रेल्वे बोर्डाकडे केली जोरदार पाठपुरावा

रोहा | प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा रेल्वे प्रवासी समितीने मांडलेल्या विविध प्रलंबित मागण्यांची गंभीर दखल घेत खासदार श्री. सुनील तटकरे यांनी रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष श्री. सतीश कुमार यांना सविस्तर पत्र पाठवून या मागण्यांवर तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली आहे. यामुळे रोहा व कोकणातील हजारो रेल्वे प्रवाशांना मोठा दिलासा मिळण्याची आशा व्यक्त होत आहे.
खासदार तटकरे यांनी आपल्या पत्रात नमूद केले आहे की, रायगड लोकसभा मतदारसंघातील रोहा रेल्वे स्थानक हे औद्योगिक, व्यापारी व प्रवासी वाहतुकीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे केंद्र आहे. मात्र, वाढत्या प्रवासी संख्येच्या तुलनेत उपलब्ध रेल्वे सेवा अपुऱ्या पडत असल्याने नागरिकांना मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. या संदर्भात रोहा रेल्वे प्रवासी समितीने सादर केलेल्या निवेदनाची प्रतही त्यांनी रेल्वे बोर्डाकडे पाठवली आहे.
खासदारांनी रेल्वे बोर्डाकडे पुढील प्रमुख मागण्या मांडल्या आहेत:
मच्छीगंधा एक्सप्रेस (गाडी क्र. १२६१९/१२६२०) ला रोहा स्थानकावर अतिरिक्त थांबा देण्यात यावा.
रोहा–दिवा मेमू सेवांची संख्या वाढविण्यासाठी पेण–दिवा मेमू रेकचा वापर करण्यात यावा.
शनिवार व रविवारी वाढणारी प्रवाशांची गर्दी लक्षात घेऊन रोहा स्थानकासाठी दोन अतिरिक्त मेमू रेक उपलब्ध करून विशेष सेवा सुरू करण्यात याव्यात.
रोहा रेल्वे स्थानकावरील सुविधा वाढवून रोहा–पनवेल उपनगरी रेल्वे मार्गाची क्षमता आणि प्रवासी संपर्क अधिक सक्षम करण्यात यावा.
रोहा रेल्वे प्रवासी समितीने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, सध्या दुपारी १२.४५ ते सायंकाळी ६.३० या कालावधीत पनवेलकडून रोह्याकडे कोणतीही रेल्वे सेवा उपलब्ध नसल्याने तब्बल सहा तासांचा मोठा खंड पडतो. त्यामुळे मच्छीगंधा एक्सप्रेसला रोह्यात थांबा मिळाल्यास कोकणातील प्रवाशांची मोठी गैरसोय दूर होईल.
तसेच, सध्या उपलब्ध असलेली रोहा–दिवा मेमू सेवा वाढत्या प्रवासी संख्येसाठी अपुरी असल्याने तिच्या फेऱ्या वाढविणे आवश्यक असल्याचे समितीने नमूद केले आहे. आठवड्याच्या शेवटी कामानिमित्त, पर्यटनासाठी व इतर कारणांनी मोठ्या प्रमाणात प्रवास होत असल्याने अतिरिक्त मेमू सेवा सुरू करण्याचीही मागणी करण्यात आली आहे.
या मागण्यांवर सकारात्मक निर्णय झाल्यास रोहा, रायगड व संपूर्ण कोकणातील रेल्वे प्रवाशांना अधिक सुरक्षित, जलद आणि सोयीस्कर प्रवासाची सुविधा उपलब्ध होईल, असा विश्वास व्यक्त करण्यात येत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us