Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»राज्य»रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे पत्रकारांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.
राज्य

रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे पत्रकारांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनतर्फे पत्रकारांचा स्नेह मेळावा उत्साहात संपन्न.

 

रोहा | प्रतिनिधी  शैलेश गावंड : रोहा इंडस्ट्रियल असोसिएशन (RIA) यांच्या वतीने शुक्रवारी १७ जुलै रोजी धाटाव येथील आर आय ए सभागृहात रोहा तालुक्यातील पत्रकारांसाठी स्नेह मेळाव्याचे आयोजन करण्यात आले. पत्रकार आणि उद्योग क्षेत्र यांच्यातील संवाद अधिक दृढ व्हावा तसेच परस्पर सहकार्याची भावना वृद्धिंगत व्हावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला पत्रकारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला होता.

तर सदरच्या संवाद मेळावा प्रसंगी यावेळी मार्गदर्शन करताना असोसिएशनचे अध्यक्ष पी. पी.बार्देस्कर यांनी सांगितले की, रोहा-धाटाव एमआयडीसी ही राज्यातील इतर अनेक औद्योगिक क्षेत्रांच्या तुलनेत सर्वाधिक वृक्षसंपदा असलेली हरित एमआयडीसी आहे. पर्यावरण संवर्धनाबरोबरच येथील औद्योगिक परिसरातील अपघातांचे प्रमाणही इतर एमआयडीसीच्या तुलनेत लक्षणीयरीत्या कमी असल्याचे त्यांनी आवर्जून नमूद केले.

तसेच पुढे बोलताना त्यांनी लघु व मध्यम उद्योगांच्या वाढीमुळे स्थानिक स्तरावर रोजगारनिर्मिती होत असून विकासाला चालना मिळते. त्यामुळे नागरिकांचे राहणीमान उंचावण्यास मदत होत असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमादरम्यान उपस्थित पत्रकारांना पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी सुपारीच्या रोपांचे वाटप करण्यात आले. तसेच उपस्थितांसाठी स्नेहभोजनाचेही आयोजन करण्यात आले होते.

यावेळी असो.अध्यक्ष बारदेसकर, सेक्रेटरी कोळेकर, खजिनदार देशमुख आदी उपस्थित पत्रकार बहुसंख्येने उपस्थित होते तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पराग फुकणे यांनी केले. यावेळी देशमुख साहेबांनी उपस्थितांचे आभार मानले. हा स्नेह मेळावा यशस्वी करण्यासाठी रोहा इंडस्ट्रियल असोसिएशनच्या पदाधिकारी, सदस्य व सर्व सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सेवादल आळी सन्मित्र मंडळातर्फे मोफत शरीर तपासणी व आरोग्य मार्गदर्शन शिबिर

September 27, 2026

वैज्ञानिक माहितीचा विविध विभागांनी प्रभावीपणे उपयोग करावा–जिल्हाधिकारी किशन जावळे केंद्रीय भूजल मंडळातर्फे अहवाल सादरीकरण व माहिती प्रसार कार्यशाळा संपन्न

September 24, 2026

रोहा तालुक्यात २९ सप्टेंबरला दोन ठिकाणी रोजगार मेळावे युवक-युवतींनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे; रोशन चाफेकर यांचे आवाहन

September 23, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us