Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»शनिवारी पनवेलमध्ये ‘निष्पाप’ नाटकाचे विनामूल्य प्रयोग
ताज्या बातम्या

शनिवारी पनवेलमध्ये ‘निष्पाप’ नाटकाचे विनामूल्य प्रयोग

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
शनिवारी पनवेलमध्ये ‘निष्पाप’ नाटकाचे विनामूल्य प्रयोग
पनवेल (प्रतिनिधी) दानशूर व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त श्री रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळातर्फे एक विशेष सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. या अंतर्गत मुंबई मराठी पत्रकार संघ प्रस्तृत ‘निष्पाप’ या नाटकाचे विनामूल्य सादरीकरण करण्यात येणार आहे.
       हा प्रयोग येत्या शनिवारी दिनांक २१ मार्च २०२६ रोजी सायंकाळी ४ वाजता पनवेल येथील आद्यक्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात पार पडणार आहे. या निमित्ताने रसिकांना दर्जेदार नाट्यप्रयोग पाहण्याची संधी उपलब्ध होणार आहे. चोवीस तास बातम्यांच्या जगात वावरणाऱ्या पत्रकारांच्या संवेदनशीलता आणि सर्जनशीलतेला रंगभूमीवर योग्य व्यासपीठ मिळावे, या उद्देशाने मुंबई मराठी पत्रकार संघाने पहिल्यांदाच ६४ व्या राज्य नाट्य स्पर्धेत सहभाग नोंदवला असून पदार्पणातच दोन पुरस्कार पटकावण्याचा मान मिळवला आहे. मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण निर्मित या नाटकासाठी लेखक प्रा. दिलीप परदेशी यांचे प्रभावी लेखन आणि दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांचे कसदार दिग्दर्शन लाभले आहे. ‘निष्पाप’ हे नाटक पत्रकारांच्या अभिनयकौशल्याला नवी दिशा देणारे ठरत आहे. या नाटकात ज्येष्ठ पत्रकार देवदास मटाले आणि स्वाती घोसाळकर प्रमुख भूमिकेत आहेत. तसेच दिग्दर्शक गुरुदत्त लाड यांच्यासह प्रशांत चिडे, रश्मी महांबरे, सिद्धेश शिगवण आणि सुरेश ठुकरुळ यांनीही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या आहेत. हा नाट्यप्रयोग सर्वांसाठी विनामूल्य खुला असून, पनवेल आणि परिसरातील नाट्यप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष संदीप चव्हाण यांनी केले.
Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us