Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा.
ताज्या बातम्या

पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJuly 1, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पंचायत समिती व तालुका कृषी अधिकारी यांचे संयुक्त विद्यमाने कृषी दिन साजरा.

तळा-किशोर पितळे:-महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री कै.वसंतराव नाईक यांच्या जन्म दिनी १जुलै कृषी दिन म्हणून साजरा केला जातो.महाराष्ट्र कृषी प्रधान होण्यासाठी विषेश प्रयत्न केल्याने त्यांना हरितक्रांतीचे जनक म्हणून संबोधले जाते.याकार्यक्रमाचे आयोजन पंचायत समीच्या नानासाहेब धर्माधिकारी सभागृहात करण्यात आले होते या प्रसंगी पंचायत समिती चे सभापती, नथुराम हिलम, उप सभापती रवी शेठ मांडवकर,जिल्हा परिषद सदस्यां नलीनी लोखंडे, माजी समापती तथा विद्यमान सदस्या अक्षरा कदम, सदस्या रुपाली तांडेल, गटविकास अधिकारी सुनील गायकवाड,तालुका कृषी अधिकारी कांबळे, राष्ट्रवादी ता.अध्यक्ष नानाभौड,महिला अध्यक्षा जान्हवी शिंदे, शेतकरी संघटनेचे अध्यक्ष चंद्रकांत राऊत , सचिव कैलासजी पायगुडे व्यासपीठावर उपस्थित होते. कै.वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.कै.वसंतराव नाईक मुख्यमंत्री असताना शेतकऱ्यांना हरित क्रांती घटवून आणण्यासाठी खुप मोठे योगदान दिले आहे. त्या काळात शेती हि एक नंबर वर होती. शेतकरी देशाचा आर्थिक कणा आहे.त्यांना सोयी सुविधा उपलब्ध शेती पुरक उद्योगांना प्रोत्साहीत केले. त्यांच्या जयंती निमित्ताने राज्यात जिल्हा,राज्य पातळी वर शेतकरी पुरस्कार देऊन शेतकऱ्यांचा सन्मान केला जातो. यावेळी उपसभापती रवीशेठ मांडवकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन करताना म्हणाले की कै.वसंत राव नाईक यांचे योगदान मोठे आहेशेतकऱ्यासाठी कल्याणकारी योजना राबविल्या त्या काळात शेती हि एक नंबर वर होती.राज्य सुजलाम सुफलाम होण्या साठी जमीनी ओलीता खाली आणण्यासाठी कालवा निर्मिती केली शेतकरी देशाचा आर्थिक कणा आहे.
शासनाच्या विविध योजना सुविधा असल्या तरी कृषी विभागाच्या मार्गदर्शनाखाली विविध प्रकारच्या शेती केली पाहिजे तालुका डोंगराळ भागात असला तरी भात शेती हे एकमेव उत्पादन करतो या काळात शेती क्षेत्र कमी झाले असले तरी तालुक्यातील ग्रामीण भागातून जवळपास करवंदाची लाखो रू.उलाढाल होत आहे.जर आपणच गोळा करून उत्पन्नघेऊशकतो याचे उदाहरण देऊन भात शेती व्यतिरिक्त शेती पुरक इतर उद्योग शोधावेत.असे आवाहन केले. चंद्रकांत राऊत यांनी सांगितले की देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतकरी हा जगाचा पोशिंदा आहे.आज परिस्थिती बदल गेलीआहे शेती कनिष्ठ झाली आहे.भात शेतीचे उत्पादन खर्च अधिक आणी आर्थिक उत्पन्न कमी असल्याने परवडत नाही.वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरदार लोकांना आर्थिक स्थिती मजबूत होत गेली आहे मात्र जगाचा पोशिंदा वर्षभर मेहनत करून भाताला योग्य दर मिळत नाही मिळाला असता तर युवापिढी शेती कडे वळून प्रयोग करून राहिला असता अशी खंत व्यक्त केली. यावेळी अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त केली.या कार्यक्रमाला तालुक्यातील बहुसंख्य शेतकरी बांधव उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us