Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्सवर्ड फर्टिकेम कंपनीत भीषण आग,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, घटनेत कंपनीचे मोठे नुकसान.
ताज्या बातम्या

रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्सवर्ड फर्टिकेम कंपनीत भीषण आग,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, घटनेत कंपनीचे मोठे नुकसान.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा धाटाव औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्सवर्ड फर्टिकेम कंपनीत भीषण आग,सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही, घटनेत कंपनीचे मोठे नुकसान.

कोलाड (श्याम लोखंडे ) रोहा तालुक्यातील धाटाव औद्योगिक क्षेत्रातील
ट्रान्सवर्ड फर्टिकेम लिमिटेड कंपनीत बुधवारी १८ मार्च रोजी सायंकाळी पाच साडेपाच च्या सुमारास अचानक प्लांट मधील इमारतीच्या टेरेसवर असलेल्या कुलिंग टॉवरला अचानक आग लागल्याने सर्वत्र एकच खळबळ उडून हा हा कार माजला, तर आगीचे तांडव आणि धुराची कोंडी त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी कंपनीतील सुरक्षा दल रक्षक आणि कामगार तसेच पाचारण करण्यात आलेल्या दोन अग्निशमन दलाच्या सुरक्षा रक्षक दलाला मोठी कसरत करावी लागली असून अखेर अथक शर्यतीच्या प्रयत्नाने आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आले. यावेळी कोणतीही जीवितहानी झाली नसल्याने व्यवस्थापनाने सुटकेचा श्वास सोडले. मात्र अचानक लागलेल्या आगीत कुलिंग टॉवर सहित आजुबाजूला असलेले काही साहित्य यात जळून खाक झाल्याने कंपनीचे मोठे नुकसान झाले आहे. तसेच घडलेल्या घटनांची अधिकचा तपास सदरील पोलीस करत असल्याचे समजते.

मिळालेली माहिती अशी की औद्योगिक क्षेत्रातील ट्रान्सवर्ड फर्टिकेम लिमिटेड या कंपनीत अचानक ऑफिस इमारतीच्या टेरेसवरती असलेले बंद स्वरूपात असलेल्या एफआरपी फायबरचे कूलिंग टॉवरच्या वेल्डिंगचे काम चालू असताना फायबरने अचानक पेट घेतला. त्यामुळे ही आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र ही दुर्दैवी घटना घडली त्यात पूर्ण कुलिंग टॉवर जळून खाक झाला असून कंपनीचे खूप मोठ्याप्रमाणावर नुकसान झाले आहे. तर घडलेल्या घटनेत कामगारांच्या तसेच सेफ्टी सुरक्षा यंत्रणेच्या प्रसंगसावधेतेमुळे कोणतीही जीवित हानी झाली नसल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

मोठ्या आगीच्या तांडवामुळे तसेच काळभोर धुरांच्या लाटांची कोंडी सर्वत्र पसरल्यामुले आजू बाजूचे ग्रामस्थ तूर्तास भयभयीत होत भीतीचे वातावरण झाले होते. मात्र सदरची घटना घडताच कंपनी व्यवस्थापन यांच्याकडून अग्निशमन दलाला ताबडतोब पाचारण करण्यात आले. त्यामुळे औद्योगिक क्षेत्रातील दोन अग्निशमन बंब तात्काळ घटनास्थळी दाखल होत ही आग नियंत्रणात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करून आग ताबडतोब नियंत्रणात आणली. तसेच या घटनेची माहिती मिळताच सदरील पोलीस यंत्रणा देखील घटनास्थळी दाखल झाली असून घटनेचा तपास रोहा पोलिस निरीक्षक तसेच त्यांचे सहकारी अधिक युद्ध पातळीवर करत आहेत.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us