Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्याम लोखंडे यांची बिनविरोध निवड
ताज्या बातम्या

रोहा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्याम लोखंडे यांची बिनविरोध निवड

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 20, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी डॉ. श्याम लोखंडे यांची बिनविरोध निवड

मिलिंद अष्टीवकर यांची प्रमुख उपस्थितीत रोहा प्रेस क्लबची नवी कार्यकारिणी जाहीर;

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

पत्रकारितेच्या क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या रोहा प्रेस क्लबच्या नव्या अध्यक्षांची व कार्यकारिणीची नुकतीच निवड करण्यात आली. ज्येष्ठ पत्रकार डॉ. श्याम लोखंडे यांची रोहा प्रेस क्लबच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड करण्यात आली असून पत्रकारांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
रोहा प्रेस क्लब ही संस्था रायगड प्रेस क्लब तसेच अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेशी संलग्न असून जिल्ह्यातील जागृत, निर्भीड आणि समाजाभिमुख पत्रकारांची संघटना म्हणून ओळखली जाते. नव्या कार्यकारिणीच्या निवड प्रक्रियेचा कार्यक्रम माजी अध्यक्ष सुहास खरिवले यांच्या अध्यक्षतेखाली तसेच ज्येष्ठ पत्रकार राजेंद्र जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न झाला.
यावेळी अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंदजी अष्टीवकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. त्यांनी पत्रकार संघटनांच्या बळकटीकरणासाठी एकजुटीचे महत्त्व अधोरेखित करत नव्या कार्यकारिणीला शुभेच्छा दिल्या.
नवीन कार्यकारिणीमध्ये कार्याध्यक्षपदी सुहास खरिवले, उपाध्यक्षपदी जितेंद्र जाधव, उपाध्यक्षपदी अंजुम शेट्टे, सचिवपदी रवींद्र कान्हेकर, सहसचिवपदी दीपक भगत, खजिनदारपदी दीप वायडेकर, मुख्य संघटकपदी उद्धव आव्हाड, संघटकपदी संतोष सातपुते, संपर्क प्रमुखपदी विश्वजित लुमन, प्रसिद्धी प्रमुखपदी मरवडे तर सह प्रसिद्धी प्रमुखपदी सत्यप्रसाद आढाव यांची निवड करण्यात आली.
या पदग्रहण सोहळ्यास माजी अध्यक्ष राजेंद्र जाधव, शशिकांत मोरे, महेश बामुगडे यांच्यासह ज्येष्ठ व युवा पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते. नव्या कार्यकारिणीच्या माध्यमातून रोहा प्रेस क्लबची वाटचाल अधिक प्रभावीपणे पुढे जाईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us