पुणे येथे राष्ट्रीय मराठा पार्टीच्या विविध पदाधिका-यांची नियुक्ती जाहीर.
विशेष वृत्त (शैलेश गावंड)
राष्ट्रीय मराठा पार्टी च्या विविध पदाधिकाऱ्यांची दिनांक १४ जून रोजी निवड पुणे येथे जाहीर करण्यात आली
यामध्ये राष्ट्रीय मराठा पार्टी महाराष्ट्र प्रदेश महिला उपाध्यक्ष पदी सौ
सुनिता लोकेश जाणवेकर.
राष्ट्रीय मराठा पार्टी पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुख पदी श्री.मनोज भिमराव बाऊस्कर
तसेच राष्ट्रीय मराठा पार्टी
पिंपरी चिंचवड शहर जिल्हाअध्यक्ष पदी श्री.रामदास मनाजी जरे पाटील यांची नियुक्ती राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष मा.श्री.अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी केली आहे.
येणा-या महाराष्ट्र राज्यातील लोकसभा,विधान सभा, नगरपरिषद, महानगर पालिका,जिल्हापरिषद, पंचायत समिती ,ग्रामिण व शहरातील स्थानिक स्वराज्य संस्था मध्ये भगवा झेंडा फडकवावा.
राष्ट्रीय मराठा पार्टी च्या ध्येय धोरणानुसार व घटनेनुसार आपण कार्य करावे. आई तुळजाभवानी आपल्या कार्यास सुयश देवो अशा शुभेच्छा नियुक्तीपत्रात देण्यात आल्या आहेत.
या वेळी राष्ट्रीय मराठा पार्टीचे पश्चिम महाराष्ट्र विभागीय संपर्क प्रमुख मा.श्री.मनोज भिमराव बाऊस्कर यांचा शाल,पुष्पगुच्छ देऊन सत्कार राष्ट्रीय मराठा पार्टीचे पिंपरी चिंचवड शहर जिल्हाअध्यक्ष मा.श्री.रामदास मनाजी जरे पाटील यांनी केला
या पदाधिकारी निवडीचे स्वागत राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्री.परमेश्वर देशमुख, डाॅ.प्रेमानंद वाघमारे,सौ.मनिषा सोनी,श्री.अप्पासाहेब आहेर, राष्ट्रीय महासचिव श्री.अनिकेत जाधव, राष्ट्रीय सह सचिव.श्री. शुभम पाटील राष्ट्रीय कोषाध्यक्ष श्री.सुदेश पाटील, राष्ट्रीय सहकोषाध्यक्ष, श्री.सुर्यकांत सह्याद्री महाराज, महाराष्ट्र संघटक माहादेव पालक, प्रसिद्धी प्रमुख रामलाल शर्मा,सौ.शैला जरे , ऋषिकेश जरे, श्री.निलेश गावडे, सौ.रसिका गावडे यांनी निंवडीचे स्वागत केले आहे.