Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन वहाळ येथील पीएमश्री शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; डिजिटल शिक्षण व मूल्यशिक्षणावर भर
ताज्या बातम्या

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन वहाळ येथील पीएमश्री शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; डिजिटल शिक्षण व मूल्यशिक्षणावर भर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 15, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये प्रवेशोत्सव उत्साहात; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन
वहाळ येथील पीएमश्री शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची उपस्थिती; डिजिटल शिक्षण व मूल्यशिक्षणावर भर

पनवेल (प्रतिनिधी) उन्हाळ्याची सुट्टी संपल्यानंतर नवीन शैक्षणिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी रायगड जिल्हा परिषद शाळांमध्ये शाळा प्रवेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. विद्यार्थ्यांचे ढोल-ताशांच्या गजरात, फुलांची उधळण करून आणि औक्षणाने स्वागत करण्यात आले. जिल्ह्यातील विविध शाळांमध्ये राबविण्यात आलेल्या या उपक्रमांमुळे विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले होते. प्रवेशोत्सवाचे मुख्य आकर्षण पनवेल तालुक्यातील पीएमश्री रायगड जिल्हा परिषद शाळा, वहाळ येथे पाहायला मिळाले. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शाळेला भेट देत विद्यार्थ्यांशी संवाद साधला. यावेळी त्यांच्या हस्ते अत्याधुनिक ‘आयडियल सेंटर डिजिटल लॅब’चे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटनानंतर मुख्यमंत्र्यांनी प्रयोगशाळेची पाहणी करून तिची कार्यपद्धती जाणून घेतली.या कार्यक्रमास माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर, शालेय शिक्षण प्रधान सचिव रणजीत सिंह देओल, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार महेश बालदी, आमदार विक्रांत पाटील, शिक्षण आयुक्त सचिंद्र प्रताप सिंह, विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, जिल्हाधिकारी किशन जावळे, ज्येष्ठ नेते माजी नगराध्यक्ष जे.एम. म्हात्रे, रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले यांच्यासह अनेक स्थानिक लोकप्रतिनिधी, उपस्थित होते.

        या डिजिटल लॅबच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना दृकश्राव्य पद्धतीने शिक्षण मिळणार असून, सर्व वर्गांचा अभ्यासक्रम डिजिटल स्वरूपात उपलब्ध करण्यात आला आहे. त्यामुळे अध्यापन अधिक प्रभावी, रंजक आणि सुलभ होणार आहे. ऑनलाईन परीक्षा प्रणालीमुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये तांत्रिक कौशल्यांचा विकास होण्यास मदत होणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. राज्यातील जिल्हा परिषद शाळांमध्ये अशा प्रकारच्या डिजिटल लॅब उभारण्याचे काम वेगाने सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या ज्ञानाची आणि शैक्षणिक प्रगतीची माहिती घेतली. विद्यार्थ्यांची शिस्त, आत्मविश्वास आणि गुणवत्तापूर्ण शिक्षण पाहून त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत जिल्हा परिषद शाळांमधील गुणवत्तावाढीमुळे पालकांचा सरकारी शाळांवरील विश्वास दृढ होत असल्याचे नमूद केले. आपल्या भाषणात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मूल्याधारित शिक्षणावर विशेष भर दिला. विद्यार्थ्यांमध्ये संवैधानिक मूल्ये, स्वच्छतेच्या सवयी, पर्यावरण संवर्धनाची जाणीव तसेच सामाजिक जबाबदारी विकसित होणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. शिक्षणासोबतच सुजाण आणि जबाबदार नागरिक घडविण्याचे कार्य शासन करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us