Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»DMCC कंपनीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा
ताज्या बातम्या

DMCC कंपनीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरJune 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

DMCC कंपनीत जागतिक पर्यावरण दिन विविध उपक्रमांनी उत्साहात साजरा

108 वृक्ष लावण्या चा संकल्प – श्री.किरण हिंगणे

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रोहा येथील DMCC कंपनीमध्ये जागतिक पर्यावरण दिनानिमित्त विविध जनजागृतीपर उपक्रमांचे आयोजन करून पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात आला. “Inspire by Nature, For Climate, For Our Future” तसेच “निसर्गापासून प्रेरणा, हवामानासाठी आणि आपल्या भविष्यासाठी” या संकल्पनेवर आधारित कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले.

या निमित्ताने कंपनीत पर्यावरण विषयावरील चित्रकला, निबंध आणि घोषवाक्य (स्लोगन) स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. कर्मचाऱ्यांनी पर्यावरण संवर्धन, झाडांचे महत्त्व, प्रदूषण नियंत्रण तसेच जागतिक तापमानवाढ यांसारख्या विषयांवर स्पर्धेद्वारे आपले विचार मांडले.

सकाळी १० वाजता कंपनीच्या प्रशासकीय कार्यालयासमोर पर्यावरण शपथ कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी डेप्युटी जनरल मॅनेजर (ऑपरेशन्स) श्री. किरण हिंगणे, प्रोडक्शन हेड श्री. रविंद्र जिल्ला, प्रोडक्शन मॅनेजर श्री. सुरेश ताम्हणकर, श्री. रविंद्र परातणे, मेंटेनन्स मॅनेजर श्री. दीपक पाटील, अकाउंट्स मॅनेजर श्री. ओमकार अलीम यांच्यासह अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्या वेळी सेफ्टी मॅनेजर श्री. अरुण माने यांनी सर्व उपस्थितांना पर्यावरण संरक्षणाची शपथ दिली. त्यानंतर मार्गदर्शन करताना श्री. किरण हिंगणे यांनी पर्यावरण संवर्धनाचे महत्त्व अधोरेखित केले. “झाडे लावण्याचे महत्त्व”, “हवा व पाणी प्रदूषण आणि ते टाळण्याचे उपाय” तसेच “जागतिक तापमानवाढ” या विषयांवर त्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले. कंपनीने १०८ चा विशेष टप्पा गाठल्याच्या निमित्ताने कंपनी परिसरात १०८ वृक्षांचे वृक्षारोपण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला.

यावेळी प्रोडक्शन मॅनेजर श्री. सुरेश ताम्हणकर यांनी झाडांमुळे मिळणाऱ्या ऑक्सिजनचे महत्त्व तसेच पर्यावरण संतुलन राखण्यात वृक्षांची असलेली भूमिका याविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

यानंतर कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारापासून DPS प्लांटपर्यंत घोषणा देत पर्यावरण जनजागृती रॅली काढण्यात आली. रॅलीनंतर कंपनी परिसरात वृक्षारोपणाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. अधिकारी, कर्मचारी व कंत्राटी कामगारांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवत पर्यावरण संवर्धनाची सामूहिक जबाबदारी जपण्याचा निर्धार व्यक्त केला.

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या विविध उपक्रमांमुळे कंपनी परिसरात पर्यावरणाबाबत जनजागृती निर्माण होऊन पर्यावरण संरक्षणाचा प्रभावी संदेश देण्यात आला.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

सुनील तटकरे युवा प्रतिष्ठान आयोजित आम.अनिकेत तटकरे यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने सवलती च्या दरात घरगुती वापराचे साहित्य वाटप.

October 2, 2026

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us