Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण
  • कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»युवा नेते आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन
ताज्या बातम्या

युवा नेते आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

युवा नेते आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

रोहा शहरातील उभरते सामाजिक नेतृत्व आणि शिवसेनेचे युवा नेते आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त गुरुवारी विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. रोहा शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमांमध्ये रक्तदान शिबिर, वृक्षारोपण तसेच अन्नदान कार्यक्रमाचा समावेश होता.
ज्येष्ठ नागरिक सभागृह येथे आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अनेक युवकांनी स्वयंस्फूर्तीने रक्तदान करत सामाजिक बांधिलकीचा आदर्श समाजासमोर ठेवला. यासोबतच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी वृक्षारोपण उपक्रम राबविण्यात आला, तर गरजूंसाठी अन्नदान कार्यक्रमही आयोजित करण्यात आला.
यावेळी उपस्थित मान्यवरांनी युवकांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग घेत समाजासाठी योगदान द्यावे, असे आवाहन केले. समाजसेवा, पर्यावरण संवर्धन आणि मानवतेचा संदेश देणारे हे उपक्रम विशेष आकर्षण ठरले.
आकाश धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित या सामाजिक उपक्रमांचे नागरिकांनी कौतुक केले. कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमोद घोसाळकर, रोहा तालुका सकल मराठा समाज अध्यक्ष प्रदीप देशमुख, उपतालुका प्रमुख चंद्रकांत लोखंडे, शिवसेना नेते अशोक धोत्रे, युवती सेना जिल्हाप्रमुख सायली सदावर्ते, ग्राहक संरक्षण कक्षाचे उप जिल्हाप्रमुख श्री.नारायण खुळे, श्री.संदेश मोरे रोहा उपतालुका प्रमुख,श्री. नितीन तेंडुलकर जेष्ठ शिवसेना नेते,शिवसेना कार्यकर्ते, सामाजिक कार्यकर्ते तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

रोह्याच्या वैभवात मानाचा तुरा; छत्रपती संभाजी महाराज उद्यानाचे लोकार्पण

October 2, 2026

कोलाड लायन्स क्लबच्या वतीने ऑक्टोबर सेवा सप्ताहाच्या विविध उपक्रमांचा शुभारंभ.

October 2, 2026

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us