रोहा-अष्टमी नगरपरिषदेचा इंदौर येथे अभ्यास दौरा; आधुनिक कचरा व्यवस्थापन प्रकल्पांची पाहणी
रोहा | प्रतिनिधी : नंदकुमार बामुगडे
रोहा-अष्टमी नगरपरिषदेच्या नगराध्यक्ष , उपनगराध्यक्ष, सर्व सभापती तसेच नगरसेवकांनी इंदौर येथे अभ्यास दौरा करून तेथील आधुनिक व शाश्वत कचरा व्यवस्थापन प्रणालीची सखोल माहिती घेतली. देशातील स्वच्छ शहर म्हणून ओळख असलेल्या इंदौरमधील विविध अत्याधुनिक प्रकल्पांची यावेळी पाहणी करण्यात आली.
या दौऱ्यात Gobardhan Bio-CNG Plant येथे ओल्या कचऱ्यापासून Bio-CNG निर्मितीची प्रक्रिया प्रत्यक्ष समजून घेण्यात आली. दररोज सुमारे ५०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करून अंदाजे १७ हजार किलो Bio-CNG तयार केले जाते. यातील मोठा हिस्सा सार्वजनिक बससेवेसाठी वापरला जात असून उर्वरित ग्रीन फ्युएल उद्योगांना पुरवले जाते.


