Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
  • शेताच्या बांधावर नाविन्यपूर्ण प्रयत्नशील शेतकऱ्यांचा तळा प्रेस क्लब कडून सन्मान !
  • प्रमोदशेठ म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान आणि लायन्स क्लब ऑफ कोलाड यांच्या वतीने मोफत चष्मा वाटप.
  • कोलाड उड्डाण पुलावरून ट्रेलर पलटी, संरक्षण कठड्यांचे अभाव,सुदैवाने कोणतेही जीवित हानी नाही,
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रायगड प्रेस क्लबच्या पुरस्कारांची घोषणा; ८ एप्रिलला पनवेलमध्ये होणार भव्य गौरव सोहळा
ताज्या बातम्या

रायगड प्रेस क्लबच्या पुरस्कारांची घोषणा; ८ एप्रिलला पनवेलमध्ये होणार भव्य गौरव सोहळा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 18, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter
  1. पनवेल (प्रतिनिधी) रायगड प्रेस क्लबची महत्त्वपूर्ण जिल्हा कार्यकारिणी सभा नुकताच पनवेल येथे संपन्न झाली. या सभेत रायगड प्रेस क्लबच्या वतीने देण्यात येणाऱ्या २०२६ सालच्या विविध प्रतिष्ठित पत्रकारिता पुरस्कारांची रायगड प्रेस क्लबच्या वतीने अधिकृत घोषणा करण्यात आली असून विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत ८ एप्रिल रोजी पनवेल येथे वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात हा भव्य गौरव सोहळा पार पडणार आहे.
         सदर सभा रायगड प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत गोपाळे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर, कोकण विभागीय सचिव मनोज खांबे, माजी अध्यक्ष विजय मोकल, अनिल भोळे, कार्याध्यक्ष संजय मोहिते, सरचिटणीस दर्वेश पालकर, उपाध्यक्ष मोहन जाधव, मुख्य संघटक शशिकांत मोरे, महिला संघटिका सीमा मोरे, संघटक दिनेश सुतार, विभागीय सचिव शिवराज पार्टे, जनसंपर्क अधिकारी कमलेश ठाकूर, पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे यांच्यासह जिल्हाभरातील पदाधिकारी, तालुका अध्यक्ष व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
*जाहीर झालेले पुरस्कार व मानकरी:*
– आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान:  कमलेश सुतार (संपादक, झी २४ तास)
– रायगड प्रेस क्लब जीवन गौरव सन्मान:  उमाजी केळुस्कर (अलिबाग)
– निशिकांत जोशी स्मृती पत्रकार सन्मान:  नरेश पवार (पेण)
– क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकार सन्मान: श्रीमती तृप्ती पालकर (पनवेल)
– दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान:  स्वप्नील दुधारे (पनवेल)
– प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान:  रवींद्रनाथ ओव्हाळ (पाली)
– संतोष पवार स्मृती युवा पत्रकार सन्मान:  शिवराज पार्टे (पोलादपूर)
– अॅड. जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकार सन्मान:  विद्यानंद ओव्हाळ (कर्जत)
– डॉ. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान:  शशिकांत मोरे (रोहा)
– प्रेस क्लब अॅक्टिव्ह जर्नालिस्ट सन्मान:  चंद्रहास नगरकर (महाड) व  अमूलकुमार जैन (मुरुड)
– रायगड प्रेस क्लब विशेष सन्मान:  अजय कदम (माथेरान) व  रवींद्र मोरे (खोपोली)
– रायगड प्रेस क्लब सामाजिक कार्यकर्ता सन्मान: सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था (कोलाड) व हेल्प फाउंडेशन (खोपोली)
– रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता सन्मान:  हरेश साठे (पनवेल) व  विश्वजीत लुमन (रोहा)
चौकट- ८ एप्रिल रोजी वर्धापन दिन सोहळा*
रायगड प्रेस क्लबचा २१ वा वर्धापन दिन आणि पत्रकार सन्मान सोहळा बुधवार, ८ एप्रिल २०२६ रोजी सकाळी ११:०० वाजता क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृह, पनवेल येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाचे संयोजन ‘पनवेल महानगर प्रेस क्लब’ करणार आहे.
Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026

जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी

August 12, 2026

कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!

August 11, 2026

शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!

August 10, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us