Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रायगडचा एसएससी निकाल ९५.०३ टक्के मुलींनी मारली बाजी पोलादपूर तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक
ताज्या बातम्या

रायगडचा एसएससी निकाल ९५.०३ टक्के मुलींनी मारली बाजी पोलादपूर तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMay 8, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रायगडचा एसएससी निकाल ९५.०३ टक्के
मुलींनी मारली बाजी
पोलादपूर तालुक्याचा निकाल जिल्ह्यात सर्वाधिक

अलिबाग(रत्नाकर पाटील)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जाहीर केलेल्या दहावीच्या (एसएससी) निकालात रायगड जिल्ह्याने आपली यशाची परंपरा कायम राखली आहे. जिल्ह्याचा एकूण निकाल ९५.०३% लागला असून, दरवर्षीप्रमाणे यंदाही मुलींनी मुलांच्या तुलनेत सरस कामगिरी केली आहे. तालुकानिहाय निकालात पोलादपूर तालुक्याने ९७.६२% निकालासह जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे.

रायगड जिल्ह्यातून या परीक्षेसाठी एकूण ३५,४७५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती, त्यापैकी ३५,२१७ विद्यार्थी प्रत्यक्षात परीक्षेला बसले होते. यातील ३३,४६९ विद्यार्थ्यांनी यशाचे शिखर सर केले आहे

जिल्ह्यातील निकालाचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे सर्व १५ तालुक्यांमध्ये मुलींच्या उत्तीर्णतेचे प्रमाण मुलांपेक्षा जास्त आहे. मुलांचा सरासरी निकाल साधारण ९३% च्या आसपास असताना, मुलींनी ९७% हून अधिक मजल मारली आहे. माणगाव तालुक्यात मुला-मुलींच्या निकालात सर्वाधिक तफावत दिसून आली.
जिल्ह्यात पोलादपूरपाठोपाठ महाड (९६.९६%) आणि कर्जत (९६.९१%) या तालुक्यांनी चमकदार कामगिरी केली आहे. शैक्षणिकदृष्ट्या महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या पनवेल तालुक्यातून सर्वाधिक १२,५८१ विद्यार्थी परीक्षेला बसले होते, ज्यापैकी १२,०७१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून या तालुक्याचा निकाल ९५.९४% लागला आहे.
निकाल जाहीर होताच सोशल मीडिया आणि शाळांमध्ये जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळाले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनीही प्रतिकूल परिस्थितीवर मात करत उत्तम गुण संपादन केले आहेत. विशेषतः डोंगराळ भाग असलेल्या पोलादपूर आणि महाड तालुक्यांनी निकालात घेतलेली आघाडी कौतुकास्पद ठरत आहे.

तालुकानिहाय निकालाची टक्केवारी:

प्रथम ३ तालुके: पोलादपूर (९७.६२%), महाड (९६.९६%), कर्जत (९६.९१%), पनवेल (९५.९४%), अलिबाग (९५.३५%), उरण (९४.८९%), मुरुड-जंजिरा (९४.५९%), माणगाव (९४.५०%), रोहा (९४.३५%), पेण (९३.७५%), म्हसळा (९३.०६%), श्रीवर्धन (९२.१४%), खालापूर (९२.१४%),तळा (८६.२९%)

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us