Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»सत्तावन्न वर्षांची परंपरा असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या ‘दैनिक महासागर’ या वृत्तपत्राने नुकताच रमेश धनावडे यांचा साहित्यातील ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान केला!
ताज्या बातम्या

सत्तावन्न वर्षांची परंपरा असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या ‘दैनिक महासागर’ या वृत्तपत्राने नुकताच रमेश धनावडे यांचा साहित्यातील ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान केला!

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

सत्तावन्न वर्षांची परंपरा असलेल्या संपूर्ण महाराष्ट्रभर पसरलेल्या ‘दैनिक महासागर’ या वृत्तपत्राने नुकताच रमेश धनावडे यांचा साहित्यातील ‘रायगड रत्न’ पुरस्कार देऊन सन्मान केला!

हा सोहळा चिंतामणराव देशमुख सभागृह रोहा येथे मोठ्या दिमाखात पार पडला. यावेळी व्यासपीठावर टीव्ही ॲक्टर आणि बिग बॉस फेम जानवी किल्लेकर, दैनिक महासागरचे मालक व मुख्य संपादक श्रीकृष्ण चांडक, रोहा नगराध्यक्षा वनश्री शेडगे, विधानसभा मा.आमदार अनिकेत तटकरे, कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका अध्यक्ष साहित्यिक रमेश धनावडे, सिटी बेल चॅनल मालक व पनवेल पत्रकार विकास मंचचे मंदार दोंदे, दैनिक महासागरचे रायगड जिल्हा प्रमुख दत्तात्रेय कुलकर्णी, जेएसडब्ल्यूचे पीआरओ कुमार थत्ते इत्यादी मान्यवर उपस्थित होते. रमेश धनावडे यांची मनतरंग, उर्मी, जीवनगाणे, कवितेच्या सुरातून, नादखुळा असेच काहीतरी, अशी सहा पुस्तके प्रकाशित आहेत.

त्यांचा’जीवनगाणे’ स्तंभ दैनिक कृषीवलमध्ये सलग तीन वर्षे प्रसिद्ध होत होता. ‘गुदगुल्या’ या राजकीय व सामाजिक वात्रटिका दैनिक पुढारीमध्ये प्रसिद्ध झाल्या आहेत. दैनिक रायगड टाईम्ससाठी त्यांच्या ‘बी पॉझिटिव्ह’ या डिजिटल मुलाखती प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांच्या अनेक दिवाळी अंकांमध्ये कथा, लेख आणि कविता प्रसिद्ध झाल्या आहेत. त्यांचा ‘कवितेच्या सुरातून’ हा महाराष्ट्रातील प्रख्यात कवींवरील स्तंभ दैनिक पुढारीमध्ये सलग दीड वर्ष प्रसिद्ध झाला आहे.

त्यांनी माजी विशेष कार्यकारी अधिकारी महाराष्ट्र शासन म्हणून काम केले आहे. त्यांनी आकाशवाणी मुंबई केंद्रावर अर्धा तास स्वरचित काव्यवाचन करून रसिकांची मने जिंकली आहेत. तसेच ते अलिबाग लायन्स क्लबचे माजी प्रेसिडेंट आहेत. सध्या ते कोकण मराठी साहित्य परिषद अलिबाग तालुका अध्यक्ष आणि रायगड जिल्हा कार्यकारिणी सदस्य म्हणून कार्यरत आहेत. ‘गोष्ट तिच्या प्रेमाची’ या मराठी चित्रपटासाठी त्यांचे गीत आर्या आंबेकर यांनी गायले आहे. ते अनेक काव्यसंमेलनात कवी म्हणून आमंत्रित असतात.

रमेश धनावडे यांना आजवर रायगड भूषण पुरस्कार, कोकण मराठी साहित्य परिषदेचा कवितेच्या सुरातून या पुस्तकासाठी प्रथम पुरस्कार, रायगड जिल्हा पत्रकार संघाचा र.वा. दिघे पुरस्कार, कृषीवल कौतुक पुरस्कार, दैनिक पुढारी सन्मान पुरस्कार, म. ना. पाटील साहित्य पुरस्कार, असे अनेक महत्त्वाचे पुरस्कार मिळालेले आहेत.

नुकत्याच मिळालेल्या साहित्यातील रायगड रत्न पुरस्काराने रमेश धनावडे यांच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा रोवला गेलेला आहे. त्यांना मिळालेल्या या साहित्य पुरस्काराबद्दल समाजातील विविध स्तरांमधून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us