Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»रोहा येथे भरधाव मोटारसायकल अपघातात कब्बडीपट्टू अश्विन मिलगिरे १७ वर्षीय युवकाचा मृत्यू
ताज्या बातम्या

रोहा येथे भरधाव मोटारसायकल अपघातात कब्बडीपट्टू अश्विन मिलगिरे १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा येथे भरधाव मोटारसायकल अपघातात कब्बडीपट्टू अश्विन मिलगिरे १७ वर्षीय युवकाचा मृत्यू

रोहा प्रतिनिधी : संतोष सातपुते

रोहा-कोलाड मार्गावर भरधाव व बेदरकार मोटारसायकल चालविल्यामुळे झालेल्या भीषण अपघातात १७ वर्षीय युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना मंगळवारी (दि. २८ एप्रिल २०२६) पहाटे उघडकीस आली.
याबाबत रोहा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून फिर्यादी नरेश नारायण मोरे (वय ५४, व्यवसाय नोकरी, रा. रोहा) यांनी तक्रार दिली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दि. २८ एप्रिल रोजी पहाटे सुमारे २ वाजण्याच्या सुमारास कोलाड-रोहा रोडवर इंडियन ऑईल पेट्रोल पंपाजवळ हा अपघात घडला.
विधीसंघर्षीत बालक विजय महेश कुमावत (वय १७, रा. सदासंयोग कॉलनी, वरसे, ता. रोहा) हा त्याच्या ताब्यातील पॅशन प्रो मोटारसायकल (क्र. MH-06/AX-1793) भरधाव व निष्काळजीपणे चालवत होता. यावेळी मोटारसायकलवर मागे बसलेला अश्विन शंकर मिलगिरे (वय १७, रा. सदासंयोग कॉलनी, वरसे) याचा तोल जाऊन तो रस्त्यावर डोक्यावर पडला. या अपघातात त्याला गंभीर दुखापत झाली आणि त्याचा मृत्यू झाला.
या प्रकरणी महेश कुमावत (रा. सदासंयोग कॉलनी, वरसे) तसेच संबंधित विधीसंघर्षीत बालक यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या कलम १२५(अ), १२५(ब) तसेच मोटार वाहन कायद्यातील कलम १८४, १३४ अन्वये गुन्हा क्रमांक १०७/२०२६ दाखल करण्यात आला आहे.
जखमी युवकाला तात्काळ उपजिल्हा रुग्णालय, रोहा येथे दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार आशुतोष म्हात्रे करीत असून, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us