Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»महाराष्ट्राचा लोकप्रिय नंदी हिंद केसरी बकासुर यांचे रोहा तालुक्यात जल्लोषात स्वागत, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांच्या माध्यमातून हजारो प्रेमींना घडले दर्शन, आमदार दळवींची उपस्थिती
ताज्या बातम्या

महाराष्ट्राचा लोकप्रिय नंदी हिंद केसरी बकासुर यांचे रोहा तालुक्यात जल्लोषात स्वागत, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांच्या माध्यमातून हजारो प्रेमींना घडले दर्शन, आमदार दळवींची उपस्थिती

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 19, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

महाराष्ट्राचा लोकप्रिय नंदी हिंद केसरी बकासुर यांचे रोहा तालुक्यात जल्लोषात स्वागत, सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर यांच्या माध्यमातून हजारो प्रेमींना घडले दर्शन, आमदार दळवींची उपस्थिती.

कोलाड (श्याम लोखंडे)महाराष्ट्राचा लोकप्रिय असलेला नंदी ज्यांनी सलग चौदा वेळा हिंद केसरी जिंकून आपल्या मालकाचे नाव लौकिक मिळवले आणि सबंध महाराष्ट्रातील बैल गाडा शर्यतीचे मालक आणि त्याचे रसिक चाहत्यांची मने जिंकून विजेतेपद पटकावले आणि मानाचा तुरा रोवला असा नावाजलेला नामवंत नंदी बैल बकासुर यांचे आगमन रोहा तालुक्यात शनिवारी १८ एप्रिल रोजी सायंकाळी क्रिकेटची पंढरी समजल्या जाणाऱ्या कोलाड आंबेवाडी परिसरातील संभे येथील मैदानावर मोठ्या जल्लोषात करण्यात आले प्रसंगी रोहा अलिबाग मुरूडचे दमदार आमदार तथा राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे विश्वासू समर्थक महेंद्रशेठ दळवी उपस्थित होते.

द्वादशम हिंद केसरी बकासुराचे रोहा संभे येथील मैत्री चषक स्पर्धेत आगमन होताच सर्वत्र एकच जल्लोष आणि आनंदोत्सव पहावयास मिळाला हजारो क्रिकेट खेळाडूंसह रसिक प्रेक्षक तसेच बैल गाडा शर्यतीचे मालक आणि त्याचे चाहत्यांना मोठ्या उत्साहात या प्रसंगी दर्शन घडले.

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत गोवा रायडर्स ग्रुप आयोजित मैत्री चषक – २०२६ द्वादशम हिंदकेसरी देव याचे मैत्री चषक २०२६ क्रिकेटची पंढरी असलेल्या संभे मैदानावर शनिवारी सायंकाळी ८ वाजता मोठ्या उत्साहात आगमन होताच अनेक चाहत्यांच्या चेहऱ्यावरील हाव भाव फुलून आले क्रिकेट स्पर्धेतील खेळाडूंसह रसिक प्रेक्षक या साऱ्यांची उत्सुकता द्वादशम हिंद केसरी देव बकासुर याला पाहण्याची शिगेला पोहचलेली उत्कुंठा आणि त्याला पाहण्याची व दर्शनाची ओढ लागली होती.

रायगड रोहा तालुक्यातील पुगाव गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते प्रमोद अनंत म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत मैत्री चषक व रोहा तालुका असोसिएशन प्रीमियर लीग चषक स्पर्धा १४ एप्रिल ते १८ एप्रिल २०२६ या कालावधीत पाच दिवस भव्य दिव्य रजनी प्रकाशझोतातील स्पर्धेचे दिमाखदार मैत्री चषक क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आल्या होत्या स्पर्धेचे उदघाटन सोहळा मंगळवारी १४ एप्रिल रोजी सायंकाळी रायगड जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व प्रीमियर लीगचे अध्यक्ष मंगेश वाकडीकर व आयोजक प्रमोद म्हसकर आदी निमंत्रित प्रमुख पाहुणे यांच्या शुभहस्ते व साऱ्या क्रिकेट खेळाडू व रसिक प्रेक्षकांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साही वातावरणात झाले.तसेच मैदानावर क्रिकेटची रंगत धडाकेबाज फलंदाजांची फटकेबाजी गोलंदाज यांच्या गोलंदाजीचा नजराणा रसिक प्रेक्षकांना बेधुंद करत होते. त्यामुळे या सुरू असलेल्या प्रीमियर लीग मैत्री चषकला दररोज रसिक प्रेषक यांचा वाढता प्रतिसाद पहावयास मिळत असल्याचे दिसून येत होते. तर क्रिकेट खेळाच्या रंगत सोहळ्यात याच मैदानावर चक्क महाराष्ट्राचा नंदी देव द्वादशम हिंद केसरी बकासुर याचा जवळून दर्शन साऱ्या रोहेकर मंडळी आणि क्रिकेट खेळाडू क्रीडा प्रेमी यांना प्रथम घडल्याने त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद वाढला होता.

“द्वादशम हिंद केसरी बकासुर” हा भारतीय बैलगाडा शर्यतींमधील एक खूप नावाजलेला आणि गाजलेला बैल आहे, ज्याला “द्वादशम हिंद केसरी” म्हणजेच १२ व्या क्रमांकाचा हिंद केसरी म्हणून ओळखले जात आहे.बकासुर हा युग्मित बैलगाडा शर्यतींमध्ये भाग घेणारा एक अत्यंत प्रसिद्ध बैल आहे, ज्याचा मालक मोहिल धुमाळ (सुजगाव, मुळशी) म्हणून मोठा चर्चेत असलेले मालक आणि बकासुर यांचे फोटो शूट आणि सेल्फी आणि वेगवेगळी रीळ काढण्यासाठी सारी युवा पिढी आकर्षित आणि सज्ज झाली होती.

सामाजिक कार्यकर्ते प्रमोद म्हसकर सामाजिक प्रतिष्ठान पुरस्कृत मैत्री चषक स्पर्धेत रोहा तालुक्यातील असंख्ये खेळाडूंनी भाग घेतले आणि या रंगदार रजनी प्रकाशझोतात खेळविले जात असलेल्या खेळाचा आनंद घेतला सोबतच आयोजक प्रमोद म्हसकर यांचा एक आगळ वेगळा उपक्रमातून चक्क हजारो चाहत्यांना द्वादशम हिंद केसरी बकासुर यांचे दर्शन घडल्याने अनेकांनी याचा आनंद लुटला.

यावेळी आमदार महेंद्रशेठ दळवी, अनंत म्हसकर, प्रमोद म्हसकर, संदीप तटकरे,सुरेश महाबळे,संदेश मोरे, उद्देश वाडकर, सुरेश मगर, चंद्रकांत लोखंडे, शाहीर वसंत भोईर,गणेश शिंदे,सह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच क्रिकेट खेळाडू आणि क्रीडा प्रेमी आदी प्रतिष्ठानचे पदाधिकारी उपस्थित होते.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us