Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»स्वामी पुण्यतिथी सप्ताह सुयश कॉलनी वरसे केंद्रात भक्तिभावात संपन्न
ताज्या बातम्या

स्वामी पुण्यतिथी सप्ताह सुयश कॉलनी वरसे केंद्रात भक्तिभावात संपन्न

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

स्वामी पुण्यतिथी सप्ताह सुयश कॉलनी वरसे केंद्रात भक्तिभावात संपन्न

 

रोहा प्रतिनिधी (संतोष सातपुते)

सुयश कॉलनी, वरसे येथील श्री स्वामी समर्थ सेवा व अध्यात्मिक विकास मार्ग (दिंडोरी प्रणित) केंद्रात स्वामी पुण्यतिथी सप्ताह मोठ्या उत्साहात आणि भक्तिभावपूर्ण वातावरणात संपन्न झाला. दिनांक ९ एप्रिल ते १५ एप्रिल २०२६ या कालावधीत पार पडलेल्या या सप्ताहात हजारो सेवेकऱ्यांनी सहभागी होत विविध धार्मिक व आध्यात्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला.
सप्ताहभर पहाटेपासूनच सेवा केंद्रात भक्तांची लगबग दिसून येत होती. स्वामींचे दर्शन, आरती, प्रहर सेवा, यज्ञ व विविध पारायण सेवांमध्ये भाविकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला. सकाळी ८ ते रात्री ८ या वेळेत महिला सेवेकरी, तर रात्री ८ ते सकाळी ८ या वेळेत पुरुष सेवेकरी प्रहर सेवेत सहभागी होत स्वामींच्या चरणी सेवा अर्पण करत होते.


दररोज सकाळी स्वामींच्या मूर्तीचे षोडशोपचार पूजन व शिवलिंगावर अभिषेक करून भूपाळी आरती करण्यात येत होती. त्यानंतर गुरुचरित्र सामुदायिक पारायण, श्री नवनाथ पारायण, श्रीमद् भागवत, श्रीपाद श्रीवल्लभ चरित्र वाचन तसेच आदिमायेचा जागर अशा विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या सर्व सेवा राष्ट्र व विश्वकल्याणाच्या उद्देशाने पार पडल्या.
सप्ताहाच्या सांगता दिवशी जोगव्याच्या कार्यक्रमाने भक्तिमय वातावरण निर्माण झाले. या कार्यक्रमात बालसंस्कार गटातील बाल सेवेकऱ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला.
या सप्ताहात सुप्रसिद्ध आयुर्वेदाचार्य श्री शिरीष कुमार पेंडसे (नागपूर), दंत चिकित्सक डॉ. अवनी आशिष केंद्रे, तसेच कोकण प्रशासकीय प्रतिनिधी व अलिबाग सेवा केंद्राचे प्रतिनिधी यांनी विविध विषयांवर मार्गदर्शन केले. तसेच सायबर क्राईम या महत्त्वाच्या विषयावरही जनजागृती करण्यात आली.
कार्यक्रमादरम्यान रोहा नगराध्यक्ष कु. वनश्री शेडगे, नगरसेविका सौ. नीता हजारे, नगरसेवक महेंद्र गुजर यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य व सरपंच अमित मोहिते आदी मान्यवरांनी उपस्थिती दर्शवली.
सप्ताहाच्या अखेरीस सर्व भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. सर्व सेवेकऱ्यांच्या सहकार्यामुळे हा सप्ताह आनंदमय व मंगलमय वातावरणात पार पडला.
श्री स्वामी समर्थ 🙏

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us