Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»पत्रकार आणि राजकीय नेते यांनी एकत्रित काम केले तर अशक्य असे काहीच नाही . —–मंत्री नितेश राणे
ताज्या बातम्या

पत्रकार आणि राजकीय नेते यांनी एकत्रित काम केले तर अशक्य असे काहीच नाही . —–मंत्री नितेश राणे

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 10, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

पत्रकार आणि राजकीय नेते यांनी एकत्रित काम केले तर अशक्य असे काहीच नाही . —–मंत्री नितेश राणे

मुंबई गोवा महामार्ग डिसेंबर २०२६ पर्यंत पूर्ण होईल
रोहा( वार्ताहर) दि.९ एप्रिल.
पत्रकार आणि राजकीय नेते हे जर एकत्र येऊन काम केले तर कुठलाही विषय अशक्य राहणार नाही.तुम्हा पत्रकारांना समाजाच्या समस्या बाबत आस्था आहे आणि त्यांच्यासाठी तुम्ही तुमची लेखणी चालवताय प्रसंगी रस्त्यावर उतरून संघर्ष करताय,काम करताय याबद्दल पत्रकाराबद्दल खूप आदर आहे.आज आपल्या पत्रकारांकडून ज्या अपेक्षा आहेत,ज्या समस्या मांडल्या त्या सरकार दरबारात मांडून सोडविण्याचा प्रयत्न नक्कीच करणार.त्यातील विशेषतः राष्ट्रीय महामार्ग हा गेली पंधरा सोळा वर्ष रखडला आहे. पण आता डिसेंबर २०२६ पर्यंत तो पूर्ण होतोय.तसेच मुरुड जंजिरा मुक्ती दिन हा ३१ जानेवारी रोजी स्वतंत्र झाला त्याची आठवण म्हणून आता तो शासन स्तरावर साजरा होईल अशी ग्वाही देतो असे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे यांनी पनवेल येथील आयोजित रायगड प्रेस क्लबच्या उपस्थित पत्रकार व सत्कारमूर्ती कुटूंबीयांसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या.
रायगड प्रेस क्लब या पत्रकारांच्या सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या संघटनेचा २१ वा वर्धापन दिन सोहळा तसेच पनवेल महानगर प्रेस क्लबचा पहिला वर्धापनदिन सोहळा पनवेल मधील क्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहयेथे संपन्न झाला.या सोहळ्यात राज्यस्तरीय संपादक पुरस्कार आणि जिल्हास्तरीय पत्रकारिता पुरस्कार व पनवेल महानगर प्रेस क्लबतर्फे विशेष सन्मान पुरस्कार हे मंत्री,आमदार महोदयांचे हस्ते देण्यात आले.
या कार्यक्रमासाठी राज्याचे मत्स्य विकास मंत्री नितेश राणे,भाजपचे गटनेते प्रवीण दरेकर,याशिवाय या कार्यक्रमाचे अध्यक्ष.मराठी पत्रकार परिषद.मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख मुख्य विश्वस्त, पनवेलचे महापौर,नितीन पाटील,अध्यक्ष, मराठी पत्रकार परिषद,मुंबई,मिलिंद अष्टिवकर,मुंबई प्रेस क्लब अध्यक्ष राजा अदाटे,माजी सभापती- कोकण म्हाडा,बाळासाहेब पाटील,आंतराष्ट्रीय कामगार नेते,व काँग्रेस रायगड जिल्हाध्यक्ष,महेंद् घरत,शिवसेना महानगरप्रमुख प्रथमेश सोमण तसेच मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग सचिव मनोज खांबे,मराठी पत्रकार परिषद कोकण विभाग,रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांतजी गोपाळे,पनवेल महानगर प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत शेडगे आदी मान्यवर व्यासपीठावार उपस्थित होते.या सोहळ्याचे प्रास्ताविक रायगड प्रेस क्लब अध्यक्ष प्रशांत गोपाळे,व कोकण विभाग सचिव मनोज खांबे,यांनी केले.
यावेळी महापौर नितीन पाटील यांनी
रायगड प्रेस क्लब २१ वर्षातील आठवणी सांगून प्रेस क्लब ने रायगड जिल्ह्यातील विविध सामाजिक प्रश्न सोडविले आहेत.असे सांगितले.कामगार नेते,व काँग्रेस जिल्हा अध्यक्ष महेंद्र घरत यांनी पत्रकारांसाठी आपण नक्कीच सामाजिक बांधिलकी ठेऊन त्याना मदत करायला मी तयार असल्याचे भाषणातून सांगितले.याच व्यासपीठावर माजी सभापती बाळासाहेब पाटील यांनी रायगड प्रेस क्लबचे काम वाखाणण्यासारखे आहे.समाजाला दिशा देण्याचे काम पत्रकारांनी केले आहे असे ते म्हणाले.मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मिलिंद आष्टीवकर यांनी रायगड जिल्ह्यातील पत्रकारांची एकजूट असल्याचे सांगून आम्ही समाजाच्या हितासाठी व अन्यायविरुद्ध रायगड प्रेस क्लबने आवाज उठवीला असल्याचे सांगितले.
आम्ही सोळा वर्षांपूर्वी वाढखळ नाका येथून प्रथम रस्त्यावर उतरून आंदोलन केले. मग महामार्ग गती घेऊ लागला.मात्र मुंबई गोवा महामार्ग अजूनही पूर्ण होऊ शकत नाही याची खंत आहे याबाबत मंत्री नितेश राणे यांनी पुढाकार घ्यावा.तसेच मुरुड जंजिरा संस्थान सुद्धा उशिरा स्वातंत्र्य झाला. तो दिवस ३१ जानेवारी असून शासन स्तरावर हा दिवस मुरुड स्वतंत्र्य दिन साजरा व्हावा.या मागणीबरोबर पत्रकारावरील हल्ले बाबत शासन स्तरावर प्रयत्न करावें असे आवाहन एस एम देशमुख यांनी केले.
सामाजिक बांधिलकी घेऊन अन्यायविरुद्ध झटणारा हा रायगड प्रेस क्लब आहे.पत्रकारिता करताना आपण आपल्या समस्या बाजूला ठेवून समाजाचे विषय सोडविण्यासाठी आपण पुढाकार घेताय याबद्दल कौतुक करायला हवे. प्रेस क्लब साठी नक्की मदत करेन असे आवाहन भाजप गटनेते प्रवीण दरेकर यांनी या ठीकाणी केले.
रायगड प्रेस क्लबच्या या कार्यक्रमात मंत्री महोदयांचे हस्ते आचार्य अत्रे राज्यस्तरीय संपादक सन्मान,झी २४ तासचे संपादक कमलेश सुतार यांना,रायगड प्रेस क्लब जीवन गौरव सन्मान माजी केळुस्कर (अलिबाग),निशिकांत जोशी स्मृती पत्रकार सन्मान नरेश पवार (पेण),क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले महिला पत्रकार सन्मान: तृप्ती पालकर (पनवेल),दीपक शिंदे स्मृती व्हिडिओ जर्नालिस्ट सन्मान स्वप्नील दुधारे (पनवेल),प्रकाश काटदरे स्मृती निर्भीड पत्रकार सन्मान रवींद्रनाथ ओव्हाळ (पाली),
संतोष पवार स्मृती युवा पत्रकार सन्मान: शिवराज पार्टे (पोलादपूर),अॅड. जनार्दन पाटील स्मृती शोध पत्रकार सन्मान विद्यानंद ओव्हाळ (कर्जत),डॉ. सचिन पाटील स्मृती पत्रकारिता सन्मान शशिकांत मोरे (रोहा),प्रेस क्लब अॅक्टिव्ह जर्नालिस्ट सन्मान चंद्रहास नगरकर (महाड), व अमूलकुमार जैन (मुरुड) रायगड प्रेस क्लब विशेष सन्मान अजय कदम (माथेरान)व रवींद्र मोरे (खोपोली) याशिवाय रायगड प्रेस क्लब सामाजिक कार्यकर्ता सन्मान सह्याद्री वन्यजीव रक्षणार्थ सामाजिक संस्था(कोलाड) व हेल्प फाउंडेशन (खोपोली) मावळा प्रतिष्ठान पेण यांना व रायगड जिल्हा श्रमिक पत्रकारिता सन्मान हरेश साठे (पनवेल) व विश्वजीत लुमन (रोहा) यांना शाल सन्मानचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले.
तर यापूर्वी
पनवेल प्रेस क्लबचे ही विशेष सन्मान पुरस्कार देण्यात आले.यात पनवेल महानगर मधील समाजासाठी विशेष योगदान देणारे व्यक्ती सुहास हळदीपुरकर नेत्रतज्ञ,महारेराचे डायरेक्टर सुधाकर देशमुख,पत्रकारिकेतील जीवन गौरव पुरस्कार रमेश भोळे,समाज प्रेरणा सन्मान विजय लोखंडे,व युवा उद्योजक वैभव ढवळे,विजया कदम स्त्री शक्ती फाउंडेशन,महाराष्ट्र संतोष उरणकर,उद्योजक, मावळा प्रतिष्ठान पेण – रायगड
ग्राम संवर्धन सामाजिक संस्था बांधणवाडी,(पनवेल) यांनाही सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले.या सोहळ्याचे सूत्रसंचालन प्रवीण मोहकर यांनी सुरेख केले.या कार्यक्रमासाठी जिल्हाध्यक्ष,प्रशांत गोपाळे कार्याध्यक्ष संजय मोहिते,सचिव दर्वेश पालकर सर्व पदाधिकारी,पनवेल महानगर प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रशांत शेडगे सर्व पदाधिकारी वर्गाने हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी प्रचंड मेहनत घेतली.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us