खांबवली गावात हनुमान जन्मोत्सवा ची दिडशे वर्षाची परंपरा अजूनही कायम.हनुमान जन्मोत्सवाची सांगता.
तळा-किशोर पितळे-
तळा तालुक्यातील खांबिवली गावातील हनुमान जन्मोत्सव पांरपारीक पध्दतीने साजरा करण्याची परंपरा आधुनिक तंत्रज्ञानाचा युगात कायम राखली आहे कालपरत्वे थोडा फार बदल युवा पिढीने केला असला तरी जत्रेची काठी गुढीपाडव्याच्या दिवशी सजवून बांधली जाते रामनवमी, हनुमान जयंती जत्रेत खांबवली आदिवासी वाडी, घनगर वाडी या तीन गावात प्रत्येक घरोघरी जाऊन भेट दिली जाते पुजा आरती ओवाळणी प्रसाद केला जातो नवस केले जातात नवसाला पावते अशी ख्याती त आहे प्रत्येक वर्षी वाडी ला मान दिला जातो. हि मानाची काठी देवाचा डोंगर (द्रोणागिरी)येथे हनुमान जयंती पौर्णिमेला भेटीसाठी जाते. हा जन्मोत्सव पाच दिवस सर्व धर्म समभावाने धार्मिक एकात्मता पावित्र राखून साजरा केला जातो त्या निमित्तानेश्री सत्यनारायण महापुजा, महाआरती, महाप्रसाद मान्यवर प्रतिष्ठित व्यक्ती चा यथोचित सन्मान केला जातो. हा भावी पिढीला प्रेरणादायी ठरत आहे. या मधून कुणबी समाज संघटन सर्व धर्म समभाव एकोपा पहायला मिळतो.हा पाचदिवस सोहळा भक्ती भावाने साजरा करीत असल्याचे ग्रामस्थांच्या वतीने कुणबी समाजोन्नतीसंघ मुंबई चे अध्यक्ष यशवंत शिंदे यांनी सन्मान सोहळा प्रसंगी प्रास्ताविकातून व्यक्त केले.या सांगता सोहळ्यात खांबिवली, आदिवासी वाडी,धनगर वाडी ग्रामस्थ महिला मंडळी, शिवसेना तालुका प्रमुख प्रध्दुम्न ठसाळ,तळा शहरप्रमुख राकेश वडके लिलाधर खातू नमीत पांढरकामे,नगरसेवक रितेश मुंढे, सिराज खाचे,धनराज गायकवाड खेळू वाजे,अँड. गितेश मेकडे पत्रकार किशोर पितळे, लक्ष्मण शिंदे बुवा सुरेश शिंदे केशव हिरवे,गोविंद हिरवे, रमे हिलम आदि मान्यवर उपस्थित होते.


