Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आवश्यक : – शॉर्न क्लार्क यांचे ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालया’त प्रतिपादन.
ताज्या बातम्या

कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आवश्यक : – शॉर्न क्लार्क यांचे ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालया’त प्रतिपादन.

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 6, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी आध्यात्मिक उपाय आवश्यक : – शॉर्न क्लार्क यांचे ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालया’त प्रतिपादन.

कोलाड (श्याम लोखंडे) कोणत्याही प्रकारच्या आजारावर मात करण्यासाठी शारीरिक उपचारांसोबतच आध्यात्मिक उपाय करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाचे संशोधक. शॉर्न क्लार्क आणि सौ. श्वेता क्लार्क यांनी केले. शिरोडा येथील ‘गोमंतक आयुर्वेद महाविद्यालय’ व संशोधन केंद्रात ‘उपचारांमध्ये अध्यात्माची भूमिका’ या विषयावर आयोजित अतिथी व्याख्यानातून दोघांनी उपस्थित पदव्युत्तर विद्यार्थी यांना दिले.

सदरच्या या कार्यक्रमाला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. नीलेश कोरडे आणि गोवा कौन्सिल ऑफ आयुर्वेदिकच्या अध्यक्षा डॉ. स्नेहा भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीसह सुमारे १०० पदव्युत्तर विद्यार्थी अन् आयुर्वेद विषयातील प्राध्यापकांनी सक्रिय सहभाग घेतला. याप्रसंगी महर्षि अध्यात्म विश्वविद्यालयाच्या संशोधन पथकाने आधुनिक ऑरा आणि ऊर्जा स्कॅनर्सच्या माध्यमांतून सिद्ध केलेले निष्कर्ष उपस्थितांसमोर मांडले.

यावेळी संशोधन पथकाने सांगितले की, गेल्या २५–३० वर्षांत वैद्यकशास्त्रात अध्यात्माची गरज वाढत चालली आहे. त्यामुळे वर्ष १९९० च्या सुरुवातीस अमेरिकेतील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये अध्यात्म-आधारित अभ्यासक्रम सुरू करण्यात आले आणि एका सर्वेक्षणानुसार आज ते सुमारे ९०% महाविद्यालयांमध्ये समाविष्ट झाले आहेत. तथापि, प्राचीन भारतीय आयुर्वेदशास्त्रानुसार, कर्म (प्रारब्ध) हे रोगांचे एक मुख्य मूळ कारण मानले गेले आहे, तसेच वात, पित्त आणि कफ यांचे असंतुलनही कारणीभूत असते. आपल्या प्राचीन शास्त्रांमध्ये सत्त्व गुण वाढवणे आणि रज-तम गुण कमी करणे हे सुखी व निरोगी जीवनासाठी महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

संशोधन पथकाने पुढे सांगितले की, त्यांनी आधुनिक ऑरा आणि ऊर्जा स्कॅनर्स, तसेच संशोधन पथकातील सदस्यांच्या प्रगत सहावे इंद्रियाच्या साहाय्याने अनेक संशोधन केले. त्यांच्या निष्कर्षानुसार जीवनातील ५०% पेक्षा जास्त समस्या या पूर्णपणे आध्यात्मिक स्वरूपाच्या असतात. प्रारब्ध हे त्यामागील मुख्य कारण असून, गंभीर आजारही कर्मानुसार ठरलेले असतात. नकारात्मक ऊर्जा वैद्यकीय समस्यांना उद्भवू शकते, ती वाढवू शकते किंवा योग्य निदानालाही अडथळा आणू शकते. अशा वेळी अनुभवी आयुर्वेद वैद्य ‘भूत नाडी’ ओळखून नकारात्मक ऊर्जा सक्रिय आहे का, हे समजू शकतात आणि आध्यात्मिक उपायांद्वारे त्यावर मात करण्यात साहाय्य करू शकतात.

 

कोणत्याही वैद्यकीय समस्येमागील तिसरा आध्यात्मिक घटक म्हणजे आपल्या पितरांचा त्रास असू शकतो. एक्झिमा, अपत्यप्राप्तीमध्ये अडचणी किंवा गर्भपात, तसेच व्यसनाधीनता यांसारख्या समस्या केवळ पारंपरिक औषधांनी पूर्णपणे बऱ्या होऊ शकत नाहीत. आत्मउपाचार साधने, नियमित साधना आणि सात्त्विक जीवनशैली यांसारखे आध्यात्मिक उपाय सत्त्व गुण वाढवण्यासाठी आणि सर्वांगीण आरोग्य प्राप्त करण्यासाठी महत्त्वाचे आहेत.

संशोधनच्या निष्कर्षाविषयी त्यांनी सांगितले की, आपल्या धर्मानुसार देवाचे नामस्मरण करणे, १५ मिनिटांचे मिठाच्या पाण्याचे उपाय, स्वभावदोषांवर मात करणे आणि ताजे शिजवलेले शाकाहारी सात्त्विक अन्न सेवन करणे हे सर्व आध्यात्मिक समस्यांवर (वैद्यकीय समस्यांसह) प्रभावी आत्मउपचार साधने ठरू शकतात.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us