Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
  • गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
  • रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
  • कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
  • जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
  • कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
  • शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
  • परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»जत्रा ठरते आंदोलनाचा आवाज, प्रशासनाला जागे करण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार !
ताज्या बातम्या

जत्रा ठरते आंदोलनाचा आवाज, प्रशासनाला जागे करण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार !

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरApril 5, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

जत्रा ठरते आंदोलनाचा आवाज, प्रशासनाला जागे करण्यासाठी ग्रामस्थांचा एल्गार !

तळा -किशोर पितळे-तळा तालुक्यातील बारपे गावात सुरू असलेल्या अनाधिकृत खडी क्रशर प्रकल्पा विरोधात ग्रामस्थांनी तीव्र भूमिका घेतली असून प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडले आहे. महागाव येथील वरदायीनी देवी जत्रेच्या पार्श्वभूमीवर ग्रामस्थांनी हातात बॅनर घेऊन शांततापूर्ण पण ठाम विरोध दर्शवला.गेल्या काही महिन्यांपासून बारपे गावातील परिसरात सुरू असलेल्या खडी क्रशरमुळे धूळ प्रदूषण, आवाजाची समस्या आणि शेतीवर होणारा परिणाम याबाबत ग्रामस्थांमध्ये असंतोष वाढत आहे. स्थानिकांच्या मते, या प्रकल्पामुळे पिकांचे नुकसान होत असून नागरिकांच्या आरोग्यावरही विपरीतपरिणामहोतआहे.
*प्रशासनाला जागे करण्यासाठीजत्रेतून दिला संदेश
गावातील पारंपरिक जत्रेत मोठ्या संख्येने लोक एकत्र येतात, याच संधीचा फायदा घेत ग्रामस्थांनी आंदोलन उभारले. “खडी क्रशर बंद करा”, “आरोग्याला प्राधान्य द्या”, “शेती वाचवा खडी क्रेशर हटवा” ,”खडी प्रोजेक्ट विनाश प्रोजेक्ट” ही माती आमची आई आहे आईचा श्वास घोटणारा क्रशर आम्हाला मान्य नाही, “आई सोमजाई ,आई वरदायीनी देवी आमच्या पूर्ण गावाचा विरोध असताना आपल्या भागात एक विनाशकारी स्टोन क्रशरचा प्रकल्प होत आहे, तो प्रकल्पमुळासकट बंद व्हावा यासाठी आम्हाला बाळ दे” अशा घोषणांचे बॅनर घेऊन ग्रामस्थांनी प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त केली.ग्रामस्थांनी सांगितले की, अनेक वेळा तक्रारी करूनही प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही. त्यामुळे जत्रेसारख्या सार्वजनिक कार्यक्रमातून प्रश्न मांडण्याचा निर्णय घेण्यात आला. काही नागरिकांनी असा आरोप केला की, संबंधित प्रकल्पाला परवानगी देताना स्थानिकांचा विचारच करण्यात आलेला नाही.तहसील कार्यालयाकडून अनाधिकृत उत्खनन बाबतीत संबंधीतांवर दंडात्मक कारवाई करण्याच्या नोटीस जारी केल्या गेल्या परंतु अजूनही कुठली ठोस कारवाई करण्यात आलेली नाही.खडी क्रशरचे काम सुरूच आहे. प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी ग्रामस्थांनी या आंदोलनाचा पर्याय निवडला आहे. याबाबतीत प्रशासन कोणती भूमिका घेते याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.मात्र ग्रामस्थांनी जोपर्यंत ठोस निर्णय होत नाही, तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा इशारा दिला आहे.
या आंदोलनाला आता राजकीय स्वरूपही येण्याची शक्यता आहे.वरदायीनी देवी जत्रेला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी आ.अनिकेत तटकरे यांनी भेट दिली या भेटी दरम्यान आंदोलनकर्त्या ग्रामस्थांनी तटकरे यांची भेट घेऊन खडी क्रशर विरोधात बाबत ग्रामस्थांची भूमिका मांडली व आगामी काळात हा मुद्दा अधिक तीव्रतेने मांडण्यात येईल आंदोलन देखील मोठे होणार असल्याचे सांगितले तटकरे यांनी ग्रामस्थांचे म्हणणे एकूण घेतले आहे त्यामुळे एकूणच, बारपे येथील खडी क्रेशर विरोधातील आंदोलन आता प्रशासनासाठी डोकेदुखी ठरणार असून, यावर काय निर्णय घेतला जातो, याकडे सर्वांचे लक्षलागले आहे

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.

August 14, 2026

गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे

August 14, 2026

रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश

August 14, 2026

कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.

August 12, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us