Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»ज्येष्ठ पत्रकार , संपादक मनोज घोसाळकर यांचां साप्ताहिक रोहा टाइम्स’चा पत्रकारितेचा वारसा पुढे नेणार सुपुत्र कुणाल घोसाळकर
ताज्या बातम्या

ज्येष्ठ पत्रकार , संपादक मनोज घोसाळकर यांचां साप्ताहिक रोहा टाइम्स’चा पत्रकारितेचा वारसा पुढे नेणार सुपुत्र कुणाल घोसाळकर

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 15, 2026Updated:March 17, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

रोहा तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि रोहा टाइम्स या साप्ताहिकाचे मुख्य संपादक मनोज घोसाळकर यांचे नुकतेच दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनाने रोहा तालुका तसेच संपूर्ण रायगड जिल्हा मधील पत्रकारिता क्षेत्रात मोठी पोकळी निर्माण झाली आहे. जवळपास अडीच दशकांहून अधिक काळ त्यांनी निष्ठेने आणि निर्भीडपणे पत्रकारिता करत जनतेचे प्रश्न प्रशासनापर्यंत पोहोचवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले.

स्व. मनोज घोसाळकर यांनी २५ वर्षांहून अधिक काळ रोहा टाइम्स या साप्ताहिकाच्या माध्यमातून स्थानिक प्रश्न, सामाजिक समस्या, विकासकामे तसेच सामान्य नागरिकांच्या अडचणी सातत्याने मांडल्या. त्यांच्या लेखणीमध्ये धाडस, प्रामाणिकपणा आणि समाजाविषयी असलेली बांधिलकी स्पष्टपणे दिसून येत होती. त्यामुळे रोहा तालुक्यात पत्रकारितेच्या क्षेत्रात त्यांनी वेगळी ओळख निर्माण केली होती.

फक्त साप्ताहिकापुरतेच मर्यादित न राहता त्यांनी पत्रकारांच्या संघटनात्मक बळकटीसाठीही मोठे योगदान दिले. त्यांनी स्थापन केलेली रायगड जिल्हा पत्रकार मित्र फॉउंडेशन ही संस्था गेली २६ वर्षांपासून कार्यरत असून पत्रकारांचे प्रश्न मांडणे, पत्रकारांना मार्गदर्शन करणे आणि नवोदित पत्रकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे या माध्यमातून त्यांनी अनेक पत्रकार घडवले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा तालुका तसेच रायगड जिल्ह्यात अनेक तरुण पत्रकारितेत पुढे आले.

कालानुरूप बदल स्वीकारत त्यांनी डिजिटल माध्यमाचाही वापर सुरू केला. गेल्या ७ वर्षांपासून सुरू असलेल्या TV7 Marathi या यूट्यूब चॅनलद्वारे स्थानिक बातम्या आणि घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे कार्य त्यांनी केले. या माध्यमातूनही त्यांनी पत्रकारितेचा प्रभाव वाढवला आणि आधुनिक पत्रकारितेची दिशा दाखवली.

स्व. मनोज घोसाळकर यांनी आपल्या आयुष्यात पत्रकारिता ही केवळ व्यवसाय नसून समाजसेवेचे प्रभावी साधन आहे, हा विचार कायम जपला. त्यांच्या लेखणीमुळे अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फुटली आणि प्रशासनाचे लक्ष त्याकडे वेधले गेले. त्यामुळे समाजात त्यांच्याविषयी आदराची भावना निर्माण झाली होती.

 


दरम्यान, त्यांच्या निधनानंतर आता त्यांनी उभारलेला पत्रकारितेचा वारसा पुढे नेण्याची जबाबदारी त्यांचे सुपुत्र कुणाळ घोसाळकर यांनी स्वीकारली आहे. पुढील काळात रोहा टाइम्स साप्ताहिकाचे संपादक म्हणून कुणाल घोसाळकर काम पाहणार असून, वडिलांनी सुरू केलेले पत्रकारितेचे कार्य अधिक जोमाने पुढे नेण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला आहे.

रोहा तालुक्यात तसेच रायगड जिल्ह्यात स्व. मनोज घोसाळकर यांनी घडवलेली पत्रकारितेची परंपरा पुढील पिढीही त्याच निष्ठेने, धैर्याने आणि प्रामाणिकपणे पुढे नेईल, अशी भावना पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us