Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !
  • चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.
  • धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन
  • शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती
  • राज्यस्तरीय तांग सू डो कराटे स्पर्धेत रायगडने पटकावली १३ पदके
  • जेष्ठांच्या कला गुणांना मिळणार व्यासपीठ.विविध कलाचे होणार सादरीकरण.
  • श्रीवर्धन मतदारसंघातील विरजोली गावातील तरुण व ज्येष्ठ कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटात पक्षप्रवेश
  • ‘जागरूक ग्रामस्थ, सुरक्षित कुटुंब, सक्षम समाज’चा संदेश; रोठ बुद्रुकमध्ये सुरक्षा प्रशिक्षणातून जीवनरक्षणाचे धडे
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने श्री राम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,रामनवमीनिमित्त शोभायात्रा
ताज्या बातम्या

कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने श्री राम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,रामनवमीनिमित्त शोभायात्रा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 30, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने श्री राम नवमी जन्मोत्सव मोठ्या उत्साहात,रामनवमीनिमित्त शोभायात्रा

कोलाड (श्याम लोखंडे) रोहा तालुक्यातील कोलाड आंबेवाडी नाक्यावर रामनवमीनिमित्त सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशीच्या वतीने शोभायात्रा काढण्यात आली.तर प्रभू श्री रामाच्या रामनवमी निमित्त येथे विविध धार्मिक कार्यक्रम भक्तिमय वातावरणात तसेच मोठ्या उत्साहात पार पडले. आंबेवाडी कोलाड येथील श्री अंबर सावत मंदिर सभागृहात हिंदू संमेलनाचे देखील आयोजन करण्यात आले होते. आंबेवाडी कोलाड बाजारपेठेतून काढण्यात आलेल्या शोभायात्रेत राम भक्तांच्या मोठ्या प्रमाणावर सहभागाने संपूर्ण बाजारपेठेतील वातावरण भगवेमय आणि भक्तिमय झाले होते. सकल हिंदू समाज कोलाड आंबेवाडी पंचक्रोशी राम भक्तांकडून रामनवमी उत्सवाचे हे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी उपस्थित राम भक्तांनी आनंद लुटला.

शोभायात्रेसाठी श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक सजवून आणलेल्या बैलगाडीने सारेजण गेले भारावून.

रामनवमीसाठी रामभक्तांकडून बाजारपेठेतील रस्त्यांवर तसेच कार्यक्रमाच्या ठिकाणी कणा रांगोळी व फुलांची सजावट कारण्यात आली होती. तसेच शोभा यात्रेसाठी श्रीरामाच्या प्रतिमेसह आकर्षक म्हणून वैजनाथ येथील किशोर सावरकर यांनी बैलांना रंगी बेरंगी वस्त्र व साज चढवून बैलगाडी सजविण्यात आली तर प्रभू श्रीरामांच्या मंत्राचा जयघोष करत तसेच ढोल ताशे आदी वाद्यांचा समावेश त्याच बरोबर ऐतिहासिक असा दांड पट्टा लेझिम पथक सादर करत हा उत्सव सोहळा साजरा करण्यात आला.

हिंदू संस्कृतीत चैत्र महिना हा पवित्र महिना मानला जातो याच महिन्यात देव देवतांचे पूजन केले जाते.हिंदूनों धर्म जाणा, धर्म जगा, धर्म रक्षणासाठी संघटीत होऊन राष्ट्राचे धर्म तेज वाढवा. याच पार्श्वभूमीवर कोलाड आंबेवाडी येथे सकल हिंदू समाज पंचक्रोशीच्या वतीने हिंदूनों धर्म जाणा, धर्म जगा, धर्म रक्षणासाठी संघटीत होऊन राष्ट्राचे धर्म आणि तेज वाढवा.असा संदेश देत शोभा यात्रेला सुरुवात करण्यात आली. या शोभायात्रेत रामभक्तांनी पारंपरिक वेशभूषेत डोक्यावर भगव्या टोप्या परिधान केल्या होत्या. तसेच हाती श्रीरामाचे भगवे ध्वज घेऊन जय श्री रामच्या गजरात तल्लीन होऊन रामभक्त शोभायात्रेत सहभागी झाले होते. यामुळे संपूर्ण आंबेवाडी कोलाड नाका परिसर भागवेमय झाले होते.

सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी प्रभू श्री रामचंद्र जन्मोत्सव भक्तिमय वातावरणात संपन्न झाले. या प्रसंगी शोभा यात्रा दुपारी तीन वाजता भगवान श्री सत्यनारायणाची महापूजा व प्रभू श्री रामलल्लाच जन्मोत्सव सोहळा धार्मिक तथा आध्यात्मिक विधिवत पद्धतीने संपन्न करण्यात आले.पुरोहित अनंत जोशी व महेशस्वामी जंगम कार्यक्रमाचे यजमान रितेश राजेश गांधी दांपत्य यांच्या शुभहस्ते पूजन करण्यात आले.या निमित्ताने सायंकाळी पाच वाजता श्री गणेश सत्संग मंडळ तळवली तर्फे दिवाळी येथील नामवंत कीर्तनकार तथा प्रवचनकार हभप विजयानंद महाराज तेलंगे यांनी प्रभू रामचंद्र जन्मोत्सवानिमित्त हरिपाठ सेवा संपन्न करत मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमात सजवून आणलेली बैल गाडी आणि त्यात उंच आणि देखणी रंगी बेरंगी फुलांनी सजवलेली प्रभू श्री रामाची प्रतिमा यातच सारे भक्तगण मंत्रमुग्ध झाले होते.खालुबाजा पारंपारिक वाद्य शंखनाद तसेच स्फूर्ती ढोल पथक रोहा, वीर हनुमान नवतरुण मंडळ तिसे व कै.कृष्णाजी संभाजी गोरीवले माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी लेझीम पथक व लाठी काठीचे उत्तम या शोभा यात्रेतून सादर करून प्रभू रामभक्तांची मने जिंकत मंत्रमुग्ध केले.तर आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी व पंचक्रोशीतील सर्व स्तरातील भक्तगण तल्लीन होत या भक्तीचा आनंद लुटला.तर सकल हिंदू समाज कोलाड पंचक्रोशी या संघटनेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला युवानेते माजी आमदार अनिकेतभाई तटकरे, युवा नेते राकेशशेठ शिंदे, रोहा पंचायत समिती उपसभापती संजय मांडुळस्कर,सदस्य जगन्नाथ धनावडे,चंद्रकांत लोखंडे,मंगेश सरफळे,संजय लोटणकर,सह विविध क्षेत्रातील मान्यवर यांनी सदिच्छा भेट देत या संघटनेचे कौतुक करत शुभेच्छा दिल्या.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

मजगांव सप्तरंगी मित्र मंडळाचा साखरचौथ गणपती भाविकांचे आकर्षण !

September 30, 2026

चिल्हे येथे श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आ. अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन.

September 30, 2026

धनगर आळीत श्री साखरचौथ गणेशोत्सव उत्साहात; आमदार अनिकेत तटकरे यांच्यासह मान्यवरांनी घेतले बाप्पांचे दर्शन

September 30, 2026

शिवशाही प्रतिष्ठानचा नांदगावचा विघ्नहर्ता साखरचौथ गणपती

September 29, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us