Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»वार्तालाप कार्यक्रमात राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शेअर केले व्हिजन
ताज्या बातम्या

वार्तालाप कार्यक्रमात राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शेअर केले व्हिजन

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 29, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

वार्तालाप कार्यक्रमात राजिप अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांनी शेअर केले व्हिजन

पनवेल तालुका पत्रकार विकास मंचासोबत वार्तालाप कार्यक्रमाचे केले होते आयोजन

जिल्ह्यातील एकही अंगणवाडी अंधारात राहणार नाही…
— राजिप अध्यक्ष, मंगेश वाकडीकर

पनवेल / प्रतिनिधी
पनवेल मधील सक्रिय पत्रकारांची नोंदणीकृत संस्था असणाऱ्या पनवेल तालुका पत्रकार विकास मंचाने रविवार दिनांक २९ मार्च रोजी रायगड जिल्हा परिषदेचे नवनिर्वाचित अध्यक्ष मंगेश वाकडीकर यांच्या समवेत वार्तालाप कार्यक्रमाचे आयोजन केले होते. मंचातील तमाम सदस्यांनी मंगेश वाकडीकर यांचा यावेळी सत्कार करून त्यांना आगामी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
मंगेश वाकडीकर यांनी अत्यंत विस्तृतपणे त्यांची कार्यपद्धती आणि व्हिजन हे मंचातील सदस्यांसमवेत शेअर केले. दोन दिवसांपूर्वी सादर केलेल्या अर्थसंकल्पाबाबत देखील मंगेश वाकडीकर यांनी विस्तृत विवेचन केले. या अर्थसंकल्पामध्ये जवळपास ७०० अंगणवाड्यांवरती विद्युत जोडणी न झाल्याचा मुद्दा अग्रस्थानी ठेवला असल्याचे त्यांनी सांगितले. हा मुद्दा आम्ही प्राधान्य क्रमाने हाती घेत जिल्ह्यामधील एकही अंगणवाडी अंधारात ठेवणार नाही असा निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला.
जल जीवन मिशन,जलदुर्ग संवर्धन, सागरी पर्यटनाला चालना, ऐतिहासिक वारसा स्थळांचे सुशोभीकरण, आरोग्य अशा विविध विषयांवर मंचातील सदस्यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंगेश वाकडीकर यांनी अत्यंत अध्ययनपूर्ण उत्तर देत त्यांच्यातल्या अभ्यासू वृत्तीची चुणूक दाखवली. सल्लागार मंदार दोंदे यांनी प्रास्ताविक सादर केले तर सल्लागार तथा ज्येष्ठ पत्रकार माधव पाटील यांनी आपले मनोगतातून मंगेश वाकडीकर यांना शुभेच्छा दिल्या.
मंगेश वाकडीकर यांच्या समवेत संपन्न झालेल्या वार्तालाप कार्यक्रमाला ज्येष्ठ पत्रकार तथा सल्लागार माधव पाटील, अध्यक्ष राजेंद्र पाटील, सल्लागार विवेक पाटील, सल्लागार संजय कदम, सल्लागार मंदार दोंदे, सरचिटणीस हरेश साठे, उपसचिव राजू गाडे, निलेश सोनावणे, प्रवीण मोहोकर, लालचंद यादव, सुनील राठोड यांची प्रमुख उपस्थिती होती.

चौकट:
मी कॉर्पोरेट क्षेत्रात काम केलेले आहे, मला बँकिंग सेक्टरचा अनुभव आहे. अनेक जनकेंद्रित समाज उपयोगी उपक्रम राबविण्याचा मला अनुभव आहे. रायगड प्रीमियर लीग च्या अनुषंगाने क्रीडा क्षेत्राचा देखील मला अनुभव आहे. भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून संघटन करण्यासाठी देखील मी सक्रिय आहे आणि यासोबतच मला लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब, आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी यांच्यासह आमच्या सर्वच ज्येष्ठ नेत्यांचे मार्गदर्शन आणि आशीर्वाद लाभले आहे. या पाठबळाच्या शिदोरीच्या जोरावर मी निश्चितच लक्षणीय कामगिरी करून दाखवेन.- मंगेश वाकडीकर

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us