आमदार निरंजन डावखरे यांचा पुढाकार: शाळांना डिजिटल साधनांचे व साहित्याचे वितरण .
तळा -किशोर पितळे -आ.निरंजन डावखरे यांच्या स्थानिक विकास निधीतून तळा तालुक्यातील गो.म.वेदक माध्यमिक विद्यामंदिर,कन्या शाळा यांना डिजिटल आणि शालेय साहित्याचे वितरण करण्यात आले यामध्ये संगणक, प्रिंटर, प्रोजेक्टर आणि शिक्षणासाठी आवश्यक डिजिटल वस्तूंचा समावेश होता यावेळी भाजपा तालुका अध्यक्ष ॲड.निलेश रातवडकर यांनी सांगितले कि आ.निरंजन डावखरे हे महाराष्ट्र विधानपरिषदेत निवडून आलेले भारतीय जनता पक्षाचे आमदार आहेत. आ.निरंजन डावखरे यांच्या माध्यमातून डिजिटल साहित्य शाळांमध्ये उपलब्ध झाल्याने विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाच्या मदतीने शिकण्यास प्रोत्साहनमिळेल.शहरीभागाप्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांपर्यंत डिजिटल साधने पोहोचल्याने शिक्षणात समावेशकता आणि समान संधीची भावना वाढण्यास मदत होणार असल्याने तळा तालुक्याचे वतीने त्यांचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीचआहेत. शाळांच्या शिक्षण गुणवत्तेसाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग वाढवण्याच्या उद्देशाने संपूर्ण रायगडजिल्ह्यात आ. निरंजन डावखरे यांनी केलेले शालेय वस्तूंचे वाटप खरच कौतुकास्पद असल्याचे त्यांनी यावेळी बोलताना सांगितले.यावेळी शहर अध्यक्ष राकेश कासार,युवा शहर अध्यक्ष सुयोग बारटक्के,मोरेश्वर गोरिवले, तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे उपाध्यक्ष पुरुषोत्तम मुळे,गो.म.वेदक चे चेअरमन,श्रीराम कजबजे,विश्वस्त मारुती शिर्के मुख्याध्यापक दिलीप ठाकणे सर शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी आदी मान्यवर उपस्थित होते
Trending
- प्राथमिक आरोग्य केंद्र तळा ची जन आरोग्य समितीची सभा संपन्न.
- गुगल ड्राइव्ह आणि एआय’मुळे स्मार्ट लर्निंगला नवी दिशा – डॉ. विश्वास हासे
- रोह्याच्या माजी नगराध्यक्षांची नात कु.पावनी बारटके हिचे भारतीय दूतावास अबूधाबी आयोजित उत्स्फूर्त वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांकाचे यश
- कोंदिवडे रस्त्याचा प्रश्न समोर आणणाऱ्या झेन अल्फा टिम ला आदित्य ठाकरे यांची साथ. शाळेतील विद्यार्थ्यांशी साधला संवाद.
- जयराम अपार्टमेंट येथील स्लॅबच्या समस्येबाबत नगरपरिषद टीम व सार्वजनिक बांधकाम विभागाची संयुक्त पाहणी
- कर्जतच्या ५० नागरी प्रश्नांवर ‘डेडलाइन’; महिनाभरात कार्यवाही करा, अन्यथा आंदोलन!
- शाळकरी ‘छोट्या जेएनजी’चा शासन-प्रशासनासह लोकप्रतिनिधींना इशारा; खड्डे बुजवा, रस्ते सुरक्षित करा!
- परवाना नूतनीकरण न करताच ‘दुर्वेश मटन शॉप’ सुरू?* *ग्रामपंचायतीच्या पत्रातून २०२१ नंतर परवाना रिन्यू नसल्याची माहिती; चिपळे परिसरात चर्चेला उधाण*


