Close Menu
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.
  • रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.
  • युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप
  • सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण
  • *रायगडमध्ये अन्न व औषध प्रशासनाचा कारभार संशयाच्या भोवऱ्यात; कारवाईची मागणी*
  • *नागोठणे पोलीस स्टेशनचे अमलदार लांगी दांपत्याच्या सुपुत्राचा वाढदिवस आश्रमशाळेत, विद्यार्थ्यांना वह्या-पेन व अन्नदान*
  • *आधार कार्ड बनवताना कर्मचाऱ्यांनी केलेल्या चुकीने भोगावा लागतोय त्रास. *शाळेचा दाखल ग्राह्य धरावा जनतेची मागणी.
  • फी दरवाढीबाबत कोलाड MPSS स्कूलचे पालक आक्रमक,पालकांना कल्पना न देता विद्यार्थ्यांवर लादला जात आहे CBC चा लेड अभ्यासक्रम, एकच संताप.
YouTube Facebook
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Roha TimesRoha Times
  • Home
  • ताज्या बातम्या
  • राज्य
  • राष्ट्रीय
  • राजकारण
  • क्रीडा
  • शैक्षणिक
Home»ताज्या बातम्या»कंत्राटी ते कायम: जनरल मजदूर सभेच्या लढ्याला मोठं यश, बेक केमिकल्समध्ये १८ कामगारांना कायम दर्जा
ताज्या बातम्या

कंत्राटी ते कायम: जनरल मजदूर सभेच्या लढ्याला मोठं यश, बेक केमिकल्समध्ये १८ कामगारांना कायम दर्जा

संपादक कुणाल मनोज घोसाळकरBy संपादक कुणाल मनोज घोसाळकरMarch 28, 2026No Comments
WhatsApp Facebook Twitter
Share
WhatsApp Facebook Twitter

कंत्राटी ते कायम: जनरल मजदूर सभेच्या लढ्याला मोठं यश, बेक केमिकल्समध्ये १८ कामगारांना कायम दर्जा

प्रतिनिधी – सत्यप्रसाद आडाव चणेरा

कंत्राटी कामगारांच्या हक्कांसाठी सातत्याने लढा देणाऱ्या जनरल मजदूर सभेच्या प्रयत्नांना अखेर यश मिळाले असून बेक केमिकल्स कंपनीतील १८ कंत्राटी कामगारांना कायम कामगारांचा दर्जा देण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय व्यवस्थापनाने घेतला आहे. या निर्णयामुळे कामगारांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. जनरल मजदूर सभा आणि कंपनी व्यवस्थापन यांच्यात झालेल्या करारानुसार या कामगारांना टप्प्याटप्प्याने कायम सेवेत सामावून घेण्याची प्रक्रिया सुरू आहे. याअंतर्गत यापूर्वी ६ कामगारांना कंपनीच्या थेट रोलवर कायम करण्यात आले होते. आता नुकतेच आणखी ६ कामगारांना कायम दर्जा देण्यात आला असून त्यांना अधिकृत नियुक्तीपत्रांचे वितरण करण्यात आले.
नियुक्तीपत्र वितरण सोहळा उत्साहात पार पडला. जनरल मजदूर सभेचे सरचिटणीस संजय वढावकर, अध्यक्षा संज्योत वढावकर आणि उपाध्यक्ष शामकांत जोशी यांच्या हस्ते कामगारांना पत्रक प्रदान करण्यात आली. कंपनीकडून साईट हेड/डायरेक्टर समीर पवार, सिनिअर मॅनेजर (एचआर) गजानन बामणे, असिस्टंट मॅनेजर शैलेश निंबरे उपस्थित होते. तसेच युनियनचे सचिव जगदीश उपाध्ये, खजिनदार प्रशांत शेट्ये, रायगड संपर्क प्रमुख सुहास खरीवले यांचीही उपस्थिती होती.
प्रसंगी बेक कमिटीचे अध्यक्ष संजय शेळके, राजेश बानुगडे, विजय जाधव, सतीस चावरेकर, संदीप रटाटे तसेच मोठ्या संख्येने कामगार उपस्थित होते. या निर्णयामुळे कंत्राटी कामगारांमध्ये समाधान आणि सुरक्षिततेची भावना निर्माण झाली असून जनरल मजदूर सभेच्या कार्याचे सर्व स्तरांतून कौतुक होत आहे. भविष्यात उर्वरित कामगारांनाही कायम करण्याची प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Share. WhatsApp Facebook Twitter
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
संपादक कुणाल मनोज घोसाळकर
  • Website

Related Posts

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026
Leave A Reply Cancel Reply

ताज्या बातम्या

पल्स पोलिओ लसीकरण मोहीमेत १०४०लाभार्थ्यांनी घेतला लाभ.

June 29, 2026

रोहा प्रेस क्लबचे सर्वच उपक्रम लोकोपयोगी, पर्यावरणाशी एकरूप ; विवेक गर्ग.

June 29, 2026

युवा आधार सामाजिक संस्थेकडून ११० विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे वाटप

June 29, 2026

सामाजिक बांधिलकीचा आदर्श; बोरघरच्या काळभैरव मंदिर परिसरात बाकड्यांचे लोकार्पण

June 28, 2026
© 2026 Roha Times. Designed by ContentOcean Infotech.

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

WhatsApp us