अनंत चतुर्दशी निमित्त रोहा शहरातील विविध गणेश मूर्तींचे विसर्जन संपन्न
रोहा ( शैलेश गावंड)
दिनांक २५ सप्टेंबर रोजी अनंत चतुर्दशी निमित्त दहा दिवसाच्या गणपतीचे ढोल ताशाच्या गजरात मिरवणूक काढून विसर्जन झाले यामध्ये रोहा चा मानाचा गणपती म्हणजे एक गाव एक गणपती म्हणून परिचित असलेला सार्वजनिक गणेशोत्सवाचा भाटे वाचनालयातील गणपती तसेच जय गणेश मित्र मंडळाचा भुवनेश्वर चा राजा आणि इतर अनेक गणेश मूर्तींचे जल्लोषमय वातावरणात विसर्जन झाले रोहेकर नागरिकांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहून बाप्पा ला निरोप दिला