रोडे कुटुंबियांचा १५०/२०० वर्षांपासून एक घर (कुटुंब)एक गणपती. कौटुंबिक जिव्हाळा एकात्मतेचे घडते दर्शन समाजापुढे वेगळा आदर्श.
प्रतिनिधी / तळा किशोर पितळे
तळा शहरातील रोडे कुटुंब हे खानदानी मोठे असुन जवळपास १५०/२०० वर्षापासून एक घर एक गणपती संकल्पना अजूनही आधुनिक काळात संस्कृती जपली आहे भाद्रपदातील श्री गणेशोत्सव म्हणजे अबाला पासून वद्धांपर्यत एक पर्वणीच ठरते.गणेशोत्सव मोठ्या भक्तीभावाने उत्साहात साजरा केला जातो रोडे कुटुंबातील ९३वर्षीय जेष्ठ राजाभाऊयांनी सांगितले कि पणज़ोबा आजोबा,वडील,आणी माझी पाचवी, सहावी पिढी असून जवळपास ५०/ ६० जणांचे कुटुंब एकत्र येऊन साजरा करीत आहेत.सुख दु:खात येत असतात जरी काही कुटुंब नोकरी घंद्या निमित्ताने बाहेरगावी किंवा शहरा ठिकाणी गेली असली तरी गौरी गणपती सणासाठी मुली,सुना,जावई, नातवंडे नवविवाहिता आवर्जून उपस्थित राहून गणरायाची मनोभावे पुजासेवा आवर्तने एकादशणी श्री सत्यनारायण पुजा,महाआरती महाप्रसाद एकाच ठिकाणी घेतला जातो प्रत्येक जण वेगवेगळ्या दिवशी सकाळ संध्याकाळ ची पुजासेवा वप्रसादकरण्यासाठी संधी दिली जाते वेगवेगळ्या दिवशी महाप्रसाद वेगळा केला होता दररोज रात्री जागरण हेवेदावे विसरून कौटुंबिक जिव्हाळा जपत संगीत भजन,संगीत खुर्ची, रेकाँर्ड डान्स,एकपात्री नाटीका गप्पा टप्पा अशा कला गुणांना एकव्यासपीठ च तयार केले गेले आहे.जेणेकरुन रात्री बाहेर वाम मार्गात जावू नये या उदात्त हेतूने पूर्वजांनी घालून दिलेला पायंडा आहे आणीआजच्या पिढीने जपून भावी पिढीला या सणाचे धार्मिक महत्त्व संस्कृती जपली जावी हा उद्देश ठेवून श्री गणेशोत्सव काळात सर्वानी एकत्रितपणे उत्सव साजरा करण्या सारखा आनंद वेगळाच आहे.गौरी आवाहन सुहासिनी पुजन (लक्ष्मी घेणे) ओवसा,नवविवाहित महिलां चा ओवसा अशा भरगच्च धार्मिक कार्यक्रम या काळात केला जात आहे. श्रीगणेश प्राणप्रतिष्ठापना ते विसर्जन पर्यंतचा श्रीगणेशोत्सव भक्ती भावाने कौटुंबिक एकात्मतेचे दर्शन घडते. एवढा मोठा कौटुंबिक जिव्हाळा आणी एकात्मता शहरात दिसून येत आहे समाजापुढे वेगळा आदर्श निर्माण झाला आहे असा संदेश जात आहे